इस्लामिक देश ओमानने भारतावर दाखवला मोठा विश्वास, चीन-पाकिस्तानला लागली मिर्ची

| Updated on: Dec 21, 2023 | 7:22 PM

India-Oman Relatioship : आखाती देशांसोबत भारताचे संबंध चांगले झाले आहे. भारताने व्यापारात देखील मोठी प्रगती केली आहे. भारत आणि ओमान यांच्यात आता मुक्त व्यापार करार झाला आहे. दोन्ही देशांना यामुळे चांगलाच फायदा होणार आहे. 16 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी आणि सुलतान हैथम बिन तारिक यांच्यात भेट झाली होती. त्या भेटीनंतर भारत आणि ओमान यांच्यातील हा […]

इस्लामिक देश ओमानने भारतावर दाखवला मोठा विश्वास, चीन-पाकिस्तानला लागली मिर्ची
Follow us on

India-Oman Relatioship : आखाती देशांसोबत भारताचे संबंध चांगले झाले आहे. भारताने व्यापारात देखील मोठी प्रगती केली आहे. भारत आणि ओमान यांच्यात आता मुक्त व्यापार करार झाला आहे. दोन्ही देशांना यामुळे चांगलाच फायदा होणार आहे. 16 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी आणि सुलतान हैथम बिन तारिक यांच्यात भेट झाली होती. त्या भेटीनंतर भारत आणि ओमान यांच्यातील हा करार शक्य झाला आहे. वाणिज्य, संस्कृती, संरक्षण आणि इतर क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी दोघांमध्ये चर्चा झाली. आखाती देश ओमानसोबतच्या या मोठ्या करारानंतर चीन-पाकिस्तानला झटका लागला आहे.

ओमानसोबत मुक्त व्यापार करार हा व्यापाराला आणखी चालना देण्यासाठी मदत करेल. एईपीसीने म्हटले आहे की, भारतीय निर्यातदारांना या आखाती देशात व्यवसायाच्या मोठ्या संधी आहेत.AEPC ने म्हटले आहे की CEPA च्या दिशेने होणारी वेगवान प्रगती उत्साहवर्धक आहे आणि भारत-ओमान द्विपक्षीय व्यापारासाठी गेम चेंजर असेल.

इतक्या अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला व्यवसाय

2022-23 या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार $12.39 अब्ज होता, जो मागील वर्षी $9.99 अब्ज होता. AEPC सरचिटणीस मिथिलेश्वर ठाकूर म्हणाले की, “ओमानला RMG (रेडीमेड कपडे) निर्यात 2020 मध्ये $13 दशलक्ष वरून 2021 मध्ये $28 दशलक्ष झाली आहे. ओमानमध्ये RMG उत्पादनांवर सीमाशुल्क पाच टक्के आहे. एक लहान बाजार असले तरी, एफटीए नंतर दर काढून टाकल्यानंतर त्यात वाढ होण्याची प्रचंड क्षमता आहे आणि ते GCC देशांसाठी आणखी एक प्रवेशद्वार बनेल.

संबंधित बातमी : इस्लामिक देश इराणने भारतीयांना दिली मोठी भेट

गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) ही आखाती क्षेत्रातील सहा देशांची संघटना आहे. ज्यामध्ये सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, कुवेत, ओमान आणि बहरीन या देशांचा समावेश आहे. भारतातील सर्वात मोठा व्यापारी समूह आहे. निर्यात वाढवण्यासाठी भारत पुढील वर्षी २६-२९ फेब्रुवारी दरम्यान इंडिया टेक्स एक्स्पो २०२४ चे आयोजन करत आहे. देशांतर्गत उद्योगांकडे आकर्षित करण्यासाठी 15 डिसेंबर रोजी बंगळुरूमध्ये AEPC द्वारे रोड शो आयोजित करण्यात आला होता.