सिंगापूरमध्ये कहर करणाऱ्या कोरोनाच्या KP1 आणि KP2 प्रकाराची भारतात धडक, या राज्यांमध्ये आढळली प्रकरणे

| Updated on: May 21, 2024 | 8:25 PM

जगात अजूनही काही ठिकाणी कोरोनाचा संसर्ग सुरुच आहे. कोरोनाचे वेगवेगळे व्हेरिएंट तयार होत आहेत. सिंगापूरमध्ये तयार झालेल्या केपी१ आणि केपी २ या प्रकाराने आता भारतात देखील धडक दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात देखील याचे रुग्ण आढळले आहेत.

सिंगापूरमध्ये कहर करणाऱ्या कोरोनाच्या KP1 आणि KP2 प्रकाराची भारतात धडक, या राज्यांमध्ये आढळली प्रकरणे
Follow us on

अलीकडेच भारतात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. भारतात कोविड-19 चे 324 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये KP.2 च्या 290 प्रकरणे आणि KP.1 च्या 34 प्रकरणांचा समावेश आहे. या दोन्ही प्रकारांनी सिंगापूरमध्ये चांगलाच धुमाकूळ घातले आहे. आता या प्रकारामुळेच जग पुन्हा चिंतेत आहे. पण ही प्रकरणे आता भारतात दिसू लागल्याने भारतीयांची देखील चिंता वाढली आहे. भारतात कोरोनाच्या KP 1 ची 34 आणि KP 2 ची 290 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

कुठल्या राज्यांमध्ये आढळले रुग्ण

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकाराशी संबंधित कोणतेही गंभीर प्रकरणे आढळलेली नाहीत. पण काळजी घेण्याची गरज आहे. कारण हा प्रकार फार वेगाने पसरतो.

बंगालमध्ये 23, गोव्यात 1, गुजरातमध्ये 2 आणि हरियाणामध्ये 4, राजस्थानमध्ये 2, उत्तराखंडमध्ये 1 रुग्ण आढळला आहे.

KP 2 चे रुग्ण कुठे आढळले

केपी 2 रुग्णांची संख्या खूप अधिक आहे. याचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात आढळलेल्या रुग्णांची संख्या 148 आहे. दिल्लीत 1, गोव्यात 12, गुजरातमध्ये 23, हरियाणामध्ये 3, कर्नाटकात 4, मध्य प्रदेशात 1, ओडिशामध्ये 17, राजस्थानमध्ये 21, यूपीमध्ये 8, उत्तराखंडमध्ये 16, पश्चिम बंगालमध्ये 36 रुग्ण आढळले आहेत.

रुग्णांमध्ये कोणती गंभीर लक्षणे दिसतात

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, KP 1 आणि KP 2 हे देखील कोरोनाच्या JM 1 प्रकाराचे उप-प्रकार आहेत. याने संक्रमित रूग्णांमध्ये अद्याप कोणतीही विशेष गंभीर लक्षणे दिसली नाहीत. मात्र, सध्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. जास्त घाबरण्याची गरज नाही. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार देखील खूप वेगाने बदलतो.

कोरोनाच्या KP 1 आणि KP 2 च्या प्रकारांची लक्षणे

तापामुळे थंडी वाजून येणे किंवा फक्त ताप येणे

सतत खोकला

घसा खवखवणे

अनुनासिक रक्तसंचय किंवा वाहणारे नाक

डोकेदुखी

स्नायू दुखणे

श्वास घेण्यात अडचण

थकवा

कशाचीही चव किंवा वास नाही

कर्णबधीर

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या (जसे की पोटदुखी, सौम्य अतिसार, उलट्या)

ज्या लोकांना श्वसनाचे आजार आहेत त्यांनी यापासून सावध राहिले पाहिजे. त्यांनी गर्दीत जाणे टाळले पाहिजे. या शिवाय जर तुम्ही बाहेर गेलात तर नक्कीच मास्क घातला पाहिजे. स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली पाहिजे.