मुंबई : बिहार (bihar news) राज्यातील नवादा जिल्ह्यातील एका लग्न झालेल्या महिलेलं बाहेर अफेअर (navada viral news) होतं. ज्यावेळी प्रियकर त्या महिलेला भेटायला आला, त्यावेळी तिच्या घरच्यांनी त्याला पकडून ठेवलं. त्याला मारहाण सुध्दा करण्यात आल्याचं व्हिडीओत दिसत आहे. महिलेचा पती ज्यावेळी घरी पोहोचला, त्यावेळी त्याने टोकाला निर्णय घेतला. त्याने तिथल्या एका देवळात लग्न लावून दिलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (bihar police) व्हायरल झाला आहे. पोलिस अधिकारी म्हणत आहे की, या प्रकरणात कसल्याची प्रकारची तक्रार अद्याप आमच्याकडे आलेली नाही.
हा प्रकार बिहार राज्यातील नवादा जिल्ह्यातील नारदीगंज क्षेत्रातील कहुआरा गावातील आहे. युवक आपल्या कामासाठी बाहेर गेला होता. त्यावेळी महिलेचा प्रियकर घरी पोहोचला. युवकाच्या नातेवाईकांनी दोघांना पकडले आणि त्यांची धुलाई केली. त्यानंतर त्या तरुणाला बांधून घातला होता. ज्यावेळी महिलेच्या पतीला हा सगळा प्रकार समजला. त्यावेळी तो अधिक टेन्शनमध्ये आला. तो घरी आला, त्यानंतर त्याने दोघांना जवळच्या मंदीरात नेले, त्याचबरोबर तिथं त्यांचं लग्न लावून दिलं.
दोघांचं जबरदस्तीनं लग्न लावून दिलं जातं होतं. त्यावेळी तिथं ग्रामस्थ आणि इतर लोकं सुध्दा उपस्थित होती. विशेष म्हणजे त्या प्रियकराने महिलेच्या डोक्यात सगळ्याच्या समोर कुंकू लावलं. या प्रकारानंतर त्या दोघांना गावातून हाकलून देण्यात आलं. या सगळ्या प्रकरणात पत्नीचा नवरा काहीचं बोलायला तयार नाही. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये हा सगळा प्रकार दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओ पाहून अधिकारी काय म्हणाले ?
त्या महिलेचा पती नवादा येथील नारदीगंज परिसरातील गरहीया गावातील रहिवासी आहे. त्याचं सुध्दा लग्न झालं आहे आणि त्याला सुध्दा तीन मुलं आहेत. त्याचबरोबर ती महिला सुध्दा कहूआरा गावातील रहिवासी आहे. त्या महिलेला सुध्दा दोन मुलं आहेत. या प्रकरणी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ही बाब उजेडात आली आहे. या प्रकरणात अजूनतरी आमच्याकडे कसल्याची प्रकारची तक्रार आलेली नाही. त्यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही.