बोस्टन – कोणत्याही कुटुंबात (family)सर्वात मोठे असलेले भाऊ किंवा बहीण हे नेहमी आत्मविश्वासू (confident)आणि स्वायत्त असतात. तर लहान असलेले भाऊ-बहीण शोधातून जीवन जगण्यावर जास्त विश्वास ठेवणारे असतात. बोस्टनच्या (Boston)नॉर्थ इस्टर्न युनिव्हर्सिटीत मनोविज्ञानाचे प्राध्यापक लॉरी क्रॉमर यांनी कुटुंबातील जन्माचा होणारा प्रभाव समजवून घेत, हा शोध लावलेला आहे. या संशोधनात समोर आले आहे की, तुम्ही कुटुंबात कोणत्या क्रमांकावर जन्माला येता त्यावरुन तुमचे नेतृत्वगुणाची गुणवत्ता ठरत असते. एकाच कुटुंबातील लहान आणि मोठ्या भाऊ-बहिणींचे गुण, स्वभाव हे वेगवेगळे असतात. याचीच कारणे शोधण्याचा प्रयत्न या संशोधनात करण्यात आला आहे. कुटुंबात सर्वात मोठ्या असलेल्या भावंडाची नेतृत्व क्षमता आणि गुणवत्ता जास्त असते. ते चांगले नेतृत्व करु शकतात. कुटुंबात जन्माला आलेला सर्वाधिक धाकटा किंवा धाकटी यांना विविध शोध लावण्यात अधिक रस असतो. कुटुंबाचे वातावरण आणि पालन पोषण याचाही परिणाम या गुणांवर होत असतोच.
परिवारात ज्या मुलांचा जन्म भावंडाच मधल्या स्थआनी होतो, त्यांना आई-वडिलांचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्पर्धेला तोंड द्यावे लागते. मधल्या क्रमांकावर जन्माला येणारी मुलं ही प्रभावी संवाद असणारी असतात. परिवारात होत असलेल्या दुर्लक्षामुळे त्यांना प्रभावी वतीने व्यक्त करण्याशिवाय दुसरा पर्याय उतर नसतो. अशी भावंडं इतरांशी चांगले संबंध ठेवण्यात आणि दुसऱ्यांना मदत करण्यात नेहमी पुढाकार घेताना दिसतात. तसेच दुसऱ्या किंवा मधल्या क्रमांकावर जन्माला येणारी भावंडं हे चांगले टीम प्लेयर असतात. ते एखाद्या टीमप्रमाणे घरात आपले स्थान टिकवून ठेवतात आणि घरातील सगळ्यांशी त्यांचे संबंधही अशाच प्रकारचे असतात. सगळ्यांनी एकत्र राहण्यासाठी हे नेहमी प्रयत्न करतात. असेही या संशोधनात सांगण्यात आले आहे.
बोस्टनच्या नॉर्थ इस्टर्न युनिव्हर्सिटीत मनोविज्ञानाचे प्राध्यापक लॉरी क्रॉमर यांच्या या संशोधनाने एकाच कुटुंबात जन्माला येऊन आणि सारखे संस्कार मिळूनही एकाच घरातील मुले वेगवेगळी कशी असू शकतात, त्यांचे स्वभाव कसे भिन्न असू शकतात, या प्रश्नांकडे पाहण्याची नवी दृष्टी विकसीत झालेली आहे. प्रत्येक कुटुंबात किंवा घरात जन्माला येणाऱ्या भावंडांना आई-वडिलांकडून मिळणारी वागणूक ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे भावंडांतील भिन्न अशा स्वभावांचा उलगडा होण्यास या अभ्यासातून मदत मिळण्याची शक्यता आहे.