सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. दोन तरुणी या मेट्रोमध्ये होळी खेळताना दिसत आहेत. त्या दोघी एकमेकांना रंग लावत आहेत आणि अश्लील कृत्यही करत आहेत. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला रामलीला चित्रपटातील गाणे वाजते आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यूजर्सने या तरुणींना चांगलेच झापले आहे. हा व्हायरल झालेला व्हिडिओ दिल्ली मेट्रोतील असल्याचा बोललं जात आहे. पण अजून ते स्पष्ट झालेले नाही.
व्हिडिओमध्ये दोन मुली पांढरे कपडे घालून होळीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांना रंग लावताना दिसत आहेत. पण या दरम्यान ते काही अश्लील चाळे देखील करत आहेत. रीलसाठी हा व्हिडिओ शूट केला जात आहे. रामलीला चित्रपटातील ‘अंग लगा दे रे, मोहे रंग लगा दे रे’ हे गाणे मागे वाजत आहे. प्रत्येकजण प्रवासी आपापल्या कामात व्यस्त दिसतोय. तरुणी मात्र रंग लावून गुलाल उधळून व्हिडिओ शूट करत आहेत.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यूजर्सने यावर रोष व्यक्त केला आहे. एका यूजरने लिहिले – दिल्ली मेट्रो आता OYO सुविधा देत आहे, तीही मोफत. आणखी एका यूजरने लिहिले – मेट्रोमध्ये सर्व प्रकारच्या कृत्यांसाठी दंड आहे, परंतु अशा रील बनविण्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. एकाने लिहिले- यावर काही कारवाई होणार की महिलांना सूट आहे?.
#delhimetro के अनोखे रंग। दिल्लीवासियों के जाम कुछ इस कदर छलक रहे हैं। pic.twitter.com/4ogkhBUEvq
— Sunit Suman🇮🇳 (@sksuman538) March 23, 2024
मेट्रो प्रशासनाने याआधी अनेक वेळा याबाबत इशारा दिला आहे. सोशल मीडिया रिल्स बनवणे टाळा, असे सांगण्यात आले आहे. असे असूनही लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. दिल्ली मेट्रोच्या प्रमुखांनी नुकतेच सांगितले होते की, मेट्रो किंवा मेट्रो परिसरात कोणत्याही प्रवाशाला आक्षेपार्ह हालचाली करताना दिसल्यास त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी. आक्षेपार्ह कामांमुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.