एका व्यक्तीला साप चावला, नंतर त्या व्यक्तीने सापाला चावले, साप मेला, पुढे काय झाले…

| Updated on: Jul 06, 2024 | 5:39 PM

एक विचित्र घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला जेव्हा साप चावला तेव्हा त्या व्यक्तीने त्या सापाला पकडून दोनदा चावा घेतला. यानंतर सापाचा जागीच मृत्यू झाला. सापाला तो का चावला याबाबत स्थानिकांनी सांगितले की, असे केल्याने सापचाच जीव जातो. पुढे काय घडले जाणून घ्या.

एका व्यक्तीला साप चावला, नंतर त्या व्यक्तीने सापाला चावले, साप मेला, पुढे काय झाले...
Follow us on

बिहारमधील नवादामधून एक विचित्र घटना समोर आलीये. येथे एका व्यक्तीला साप चावला. त्यानंतर त्या व्यक्तीने ही सापाचा चावा घेतला. त्यामुळे सापाचा जागीच मृत्यू झाला. यानंतर घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. झाले असे की, नवाडा येथील संतोष लोहार हे रेल्वे लाईन टाकण्याचे काम करतो. काम झाल्यानंतर तो त्यांच्या बेस कॅम्पमध्ये झोपला होता. या दरम्यान तेथे साप आला आणि त्याला दंश केला. संतोष सांगतो की, माझ्या गावात एक युक्ती आहे की साप तुम्हाला एकदा चावला तर तुम्ही त्याला दोनदा चावा. यामुळे सर्पदंशाचे विष निष्प्रभ होते. या अंधश्रद्धेपोटी सर्पदंश झालेल्या ३५ वर्षीय संतोष लोहार यांनी हा साप हातात पकडून दाताने दोनदा चावा घेतला.

सापाचा मृत्यू झाला

संतोष लोहार याला साप चावल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. संतोष लवकरच बरा ही झाला. हॉस्पिटलने त्याला दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज दिला. पण या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. राजौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी रात्री उशिरा सर्व कामगार त्यांच्या बेस कॅम्पमध्ये झोपले होते. यावेळी संतोष लोहार नावाच्या मजुराला विषारी साप चावला.

साप चावल्यानंतर संतापलेल्या मजुराने लोखंडी रॉडच्या सहाय्याने सापाला पकडून दोनदा चावा घेतला. त्यामुळे सापाचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की, सर्पदंशामुळे माणसाच्या शरीरात विष शिरते. अशा परिस्थितीत जर माणसाने सापाला चावले तर संपूर्ण विष सापाकडे जाते. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचा जीव वाचतो.

संतोषवर उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले?

संतोषवर उपचार करत असलेले डॉक्टर सतीश चंद्र सिन्हा यांनी सांगितले की, संतोष लोहार नावाच्या व्यक्तीला साप चावला होता. त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. तरुण पूर्णपणे बरा झाला आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.