चंदीगड: भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची ( सूत्रे हाती घेतल्यानंतर आज दहा मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर भगवंत मान यांनी कॅबिनेटची (Cabinet meeting) पहिलीच बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी 25 हजार पदे तात्काळ भरण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमधील बोर्ड, कॉर्पोरेशन आणि सरकारी कार्यालयातील रिक्त पदे भरण्याचा आज मोठा निर्णय घेण्यता आला आहे. तसेच तीन महिन्यासाठी व्होट ऑन अकाऊंट घेण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प येत्या जून महिन्यात सादर केला जाणार आहे. कॅबिनेटने सप्लीमेंट्री ग्रँट्सलाही मंजूरी दिली आहे. तसेच पोलीस दलात दहा हजार नोकऱ्या देण्यात येणार आहे. इतर विविध विभागात 15 हजार नोकऱ्या देण्यात येणार आहेत. अवघ्या महिन्याभरातच ही नोकरभरती सुरू करण्यात येणार आहे. भगवंत मान यांनी पंजाबच्या तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. पहिल्याच कॅबिनेटमध्ये त्यांनी हे आश्वासन पूर्ण केलं आहे.
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज आपल्या मंत्रिमंडळात दहा जणांचा समावेश केला. त्यात एका महिलेचा समावेश आहे. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी पंजाब भवनमध्ये या मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. विशेष म्हणजे हे दहाही मंत्री पहिल्यांदाच आमदार बनले आहेत. या सर्वांनी पंजाबी भाषेतच शपथ घेतली. हरपाल सिंग चीमा, हरभजन सिंग, डॉ. विजय सिंगला, लाल चंद, गुरमीत सिंग मीत हेयर, कुलदीप सिंग धालीवाल, लालजीत सिंग भुल्लर, ब्रह्म शंकर जिम्पा, हरज्योत सिंग बैंस आणि डॉ. बलजीत कौर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांसहीत 18 पदे आहेत.
मान यांच्या मंत्रिमंडळात विविध क्षेत्रातील आमदार आहेत. या कॅबिनेटमध्ये दोन शेतकरी, तीन वकील, दोन डॉक्टर, एक सामाजिक कार्यकर्ता, एक इंजीनियर आदींचा समावेश आहे. मान यांनी शहीद भगतसिंग यांच्या खटकड कलां गावात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत 117 पैकी 92 जागांवर आम आदमी पार्टी विजयी झाली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी दोन विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत.
Chaired the first cabinet meeting. The Punjab cabinet has approved notification of 25,000 job vacancies within one month.
As we promised before the election, jobs opportunities for our Punjab’s youth will be the topmost priority of AAP Govt.
— Bhagwant Mann (@BhagwantMann) March 19, 2022
संबंधित बातम्या:
मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी, दहा मंत्र्यांनी घेतली शपथ
भगवंत मान मंत्रीमंडळाचा आज शपथविधी; दहा मंत्री घेणार शपथ, सामान्य चेहऱ्यांना संधी
धक्कादायक ! बिहारमध्ये प्रेयसीला मनवण्यासाठी केलेले आत्महत्येचे नाटक बेतले जीवावर