सरसंघचालकांच्या धर्म परिवर्तनासंबंधीच्या त्या वक्तव्याची एकच चर्चा, मोहन भागवत म्हणाले काय?

| Updated on: Apr 13, 2025 | 9:23 AM

RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील धर्म परिवर्तनावर गंभीर मंथन केले. हिंदूच्या धर्म परिवर्तनावरून देशात अनेकदा वाद विवाद झाले. पण भागवतांच्या वक्तव्याने आता नवीन चर्चा होणार असं दिसतंय.

सरसंघचालकांच्या धर्म परिवर्तनासंबंधीच्या त्या वक्तव्याची एकच चर्चा, मोहन भागवत म्हणाले काय?
सरसंघचालक मोहन भागवत
Image Credit source: गुगल
Follow us on

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या औरंगजेबापासून ते त्यापूर्वीच्या काही वक्तव्यांनी संघाची भूमिका ठसठशीतपणे समोर आली आहे. आता धर्म परिवर्तनाविषयी त्यांनी गंभीर चिंतन देशासमोर मांडले. देशातील धर्म परिवर्तनाविषयीच्या त्यांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. धर्म परिवर्तनाविषयीची काही कारणे नेहमी अधोरेखित करण्यात येतात. त्याविषयी भागवतांनी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. काय म्हणाले सरसंघचालक?

सरसंघचालक मोहन भागवत शनिवारी वलसाड जिल्ह्यातील श्री भाव भावेश्वर महादेव मंदिराच्या रौप्य महोत्सवी उत्सवात सहभागी झाले. त्यांनी देशात सुरू असलेल्या धर्म परिवर्तनाच्या मुद्दाला हात घातला. त्यांनी या विषयावर त्यांचे विचार मांडले. धर्म हा सर्वांना सुखाकडे घेऊन जाऊ शकतो. आमिष, लोभ आणि भीतीने धर्म परिवर्तन करायला नको, असे भागवत म्हणाले.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर्म परिवर्तनाच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त केली. आमिष आणि भीती आधारे धर्म परिवर्तन व्हायला नको, कारण खरा धर्म हा सर्वांना सुख आणि शांती देतो, असे ते म्हणाले. त्यांनी महाभारताचा उल्लेख केला आणि प्रत्येकाने धार्मिक विधी नियमितपणे करावेत, असे म्हटले.

हे सुद्धा वाचा

आमिष आणि भीतीला बळी पडू नका

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे शनिवारी वलसाड येथे बोलत होते. आपल्या दैनंदिन जीवनात आमिष आणि प्रलोभनांचा सामना करावा लागू शकतो. या गोष्टी त्यांना त्यांच्या धर्मापासून दूर करू शकतात. पण धर्म हाच सर्वांना आनंदाकडे नेऊ शकतो. वलसाड जिल्ह्यातील बारूमल येथील सदगुरू धाममध्ये श्री भाव भावेश्वर महादेव मंदिराच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात त्यांनी त्यांचे विचार मांडले. लोभ आणि भीतीच्या प्रभावाखाली कोणत्याही परिस्थितीत धर्म बदलू नये, असे आवाहन त्यांनी केले.

आम्हाला लढायचे नाही

सरसंघचालक म्हणाले की आम्हाला संघटित कसे व्हायचे हे माहिती आहे. आम्ही संघटित राहू इच्छितो. आम्हाला लढायचे नाही. पण आपल्याला स्वतःचे रक्षण करावे लागेल. कारण आजही अशा काही शक्ती आहेत, ज्या धर्म परिवर्तन करू इच्छितात. जेव्हा आपल्या दैनंदिन जीवनात अशा शक्ती नसल्या तरी लोभ आणि मोहाच्या घटना घडतात.