मोठी बातमी ! निवडणूक आयोगाच्या विरोधातील ठाकरे गटाची याचिका मेंशन, सुनावणी कधी होणार ?

| Updated on: Feb 21, 2023 | 11:31 AM

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले आहे त्याविरोधात उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उद्या त्यावर सूनवाणी होणार आहे.

मोठी बातमी ! निवडणूक आयोगाच्या विरोधातील ठाकरे गटाची याचिका मेंशन, सुनावणी कधी होणार ?
Image Credit source: Google
Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिका आज मेंशन झाली असून उद्या म्हणजेच बुधवारी 22 फेब्रुवारीला दुपारी साडेतीन वाजता सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ( Election Commission ) शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला दिले आहे. त्यावर आक्षेप घेत उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली होती.

सर्वोच्च न्यायालयात याचिका मेंशन करत असतांना कपिल सिब्बल यांनी शिवसेनेचे बँक अकाऊंट आणि फंड जाईल अशी भीती व्यक्त केली आहे. याशिवाय जो पर्यन्त सुनावणी होत नाही किंवा स्थगिती दिली जात नाही तोपर्यंत हे प्रकरण जसे आहे तसेच ठेवण्याची मागणी केली होती.

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी यावेळी ही सुनावणी लवकरात लवकर घेण्यात यावी किंवा तोपर्यंत कुठलाही निर्णय होऊ नये अशी मागणी केली होती, मात्र यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या वतिने सत्तासंघर्षाची सुनावणी झाल्यावर निर्णय घेऊ असे म्हंटले आहे.

हे सुद्धा वाचा

त्यामध्ये बुधवारी दुपारी साडेतीन वाजता ही सुनावणी होणार आहे. त्यासाठी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आग्रही मागणी केली होती. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयावर स्थगिती मिळते का हे पाहावं लागेल.

केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय अयोग्य असल्याचे ठाकरे गटाच्या याचिकेत म्हंटले आहे. त्यांनी त्याबाबत याचिकेत अयोग्य बाबी नमूद केल्या आहेत. त्यामुळे ही सुनावणी ठाकरे गटासाठी महत्वाची असणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगच बरखास्त करा अशी मागणी केली होती. त्यात आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत असतांना निवडणूक आयोगाचा निर्णय स्थगित करावा अशी मागणी केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे त्यामध्ये आम्ही जी कागदपत्रे दिली होती ती कशाला द्यायला लावली असेही त्यामध्ये म्हंटले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अन्याय केल्याची भावना यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

तर निवडणूक आयोगाने निर्णय देतांना आमचा पक्ष पहिला नाही. त्यामध्ये शाखाप्रमुख आणि इतर ताकद आमची बघितली नाही आणि आमदारांची संख्या बघून कसं निर्णय होऊ शकतो यावरही उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला होता.