वॉशिंग्टन | 15 जानेवारी 2024 : जगभरात अशी अनेक रहस्ये आहेत की ज्याचा शोध अजूनही लागलेला नाही. सागरी तळामध्ये लपून राहिलेली काही गुपिते आता उघड होत आहेत. मात्र, अजूनही खोल सागरामध्ये अनेक गुप्त खजिने आहेत. अशाच एका मोठ्या खजिन्याचा शोध नुकताच लागला आहे. या खजिन्यावर अमेरिकेची नजर पडली आणि अमेरीकेने संपूर्ण समुद्रच आपल्या ताब्यात घेतला. पाण्याखाली दडलेल्या त्या खजिन्यावर नजर ठेवून अमेरिकेने शांतपणे हा समुद्र काबीज केलाय.
अमेरिकेने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलत आपले सागरी सीमा क्षेत्र वाढवले आहे. यामुळे अमेरिकेचे क्षेत्रफळ सुमारे 4 लाख चौरस मैलांनी वाढले आहे. असे करण्यामागे अमेरिकेचा हेतूही खूप खास आहे. अमेरिकेचे विस्तारित महाद्वीपीय शेल्फ (ECS) म्हणून ओळखल्या जाणार्या सहा क्षेत्रांना एकत्र जोडले आहे.
अमेरिकेच्या ECS प्रदेशामध्ये सहा क्षेत्रांचा समावेश आहे. यात अटलांटिक ईस्ट कोस्ट, पॅसिफिक वेस्ट कोस्ट, बेरिंग सी, मारियाना बेटे आणि मेक्सिकोच्या आखाताचे दोन भाग यांचा समावेश आहे. अमेरिकेसाठी सर्वात मोठा ECS प्रदेश म्हणजे आर्क्टिक खंड आहे. हा उत्तरेला 350 मैल (612 किमी) आणि पश्चिम भागात 680 मैल (1,094 किमी) पेक्षा जास्त इतका पसरला आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत नुकतीच एक घोषणा केली आहे. इतर देशांप्रमाणेच अमेरिकेलाही त्याच्या ECS वरील संसाधने आणि गंभीर निवासस्थानांचे संरक्षण करणे. त्याचे व्यवस्थापन करण्याचे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार अधिकार आहेत. विशेष म्हणजे यूएसमध्ये नव्याने जोडलेले हे क्षेत्र स्पेनच्या आकाराच्या अंदाजे दुप्पट आहे.
समुद्राच्या कायद्यानुसार अमेरिकेला त्या क्षेत्रांचे सार्वभौम अधिकार आहेत. सागरी अधिवेशनाच्या कायद्यातही हे स्पष्ट आहे. अमेरिकेकडे ग्रहावरील सर्वात मोठे आर्थिक क्षेत्र आहे. तसेच, पाण्याखाली बुडलेल्या भागावरही सार्वभौम अधिकार त्यांच्याकडे आहेत.
बऱ्याच काळापासून अमेरिकेच्या सागरी क्षेत्रांमध्ये संशोधन सुरु होते. समुद्राखाली असलेल्या संसाधनांमध्ये अमेरिकेला विशेष स्वारस्य आहे. त्यामुळेच हे संशोधन सुरु होते. अमेरीकेच्या सागरी क्षेत्रांला लागून असलेल्या भागावर कुणाचाही अधिकार नाही. त्या भागासह अमेरिकेच्या सागरी क्षेत्रांच्या भागात समुद्राखाली तेल, नैसर्गिक वायू आणि मुबलक प्रमाणात खनिज यांचा मोठा साठा आढळून आला आहे. त्यामुळे अमेरिकेने या संपूर्ण सागरी क्षेत्रांवर आपला अधिकार सांगितला आहे.