उन्हाळा सुरू झाला आहे, तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. उष्णता वाढल्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. घरामध्ये थंड वातावरण राहावं यासाठी आपण पंखा, कुलर यांची मदत घेतो.
उन्हाच्या तडाख्यामुळे मुके प्राणी देखील रस्त्यानं न फिरता झाडाचा आसरा घेताना दिसत आहेत. दरम्यान तुम्हाला माहीत आहे का की असे काही झाडं आहेत, ज्या झाडांना सापांसारख्या विषारी प्राण्याचं आश्रय स्थान मानलं जातं. त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत.
अशी काही झाडं आहेत, ज्या झाडांमधून येणाऱ्या विशिष्ट सुंगंधामुळे आणि लपण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होत असल्यामुळे साप या झाडांचा अडोसा घेतात, सापच काय काही ठिकाणी विंचवासारखे कीटक देखील या झाडाखाली आढळून येतात.
लिंबोणीचं झाडं - लिंबोणीच्या झाडाची सावली थंडगार असते. तसेच या झाडाला विशिष्ट सुगंध असतो, त्यामुळे साप या झाडांकडे आकर्षित होतात. तसेच या झाडाला दाट पाणं देखील असतात त्यामुळे सापांना लपण्यासाठी देखील जागा सापडते. झाडांची जी पाणं खाली पडलेली असतात त्यामध्ये विंचू , गोम असे इतर देखील विषारी कीटक निघण्याची शक्यता असते.
बांबू - बांबूच्या झाडाखाली मोठ्या प्रमाणात अडचण असते. तसेच त्याच्या पानामध्ये लपण्यासाठी देखील जागा असते. उन्हाळ्यामध्ये साप या झाडांचा आश्रय घेऊ शकतात. तसेच अडचण असल्यामुळे विंचवासारेखे कीटक देखील झाडाखाली आढळून येतात.
या दोन झाडांप्रमाणेच चाफा, गोकर्ण आणि केळीचं झाड याखाली देखील तुम्हाला अनेकदा साप दिसू शकतो.
दरम्यान चंदनाच्या झाडाखाली देखील साप अनेकदा आढळून येतो, चंदनाचं झाडं मुळातच शितल असंत त्यामुळे अनेकदा उन्हाळ्यात या झाडाखाली साप आढळतो. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)