नवी दिल्ली: देशरभरात कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात प्रत्येक राज्यांनी कोरोना रोखण्यासाठी काही कठोर निर्णय घेतले आहेत. काही राज्यांनी सक्तीने लॉकडाऊन केला आहे. काही राज्यांनी वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. तर काही राज्यांमध्ये दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी जाहीर केली आहे. कोणत्या राज्यात काय परिस्थिती आहे, त्याचा घेतलेला हा आढावा. (These states have announced lockdown and night curfew amid Covid-19 spike)
महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन
महाराष्ट्रात दिवसाला 50 हजार रुग्ण सापडत आहेत. देशात जेवढे नवे रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी 50 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे राज्यात वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यात आठ-आठ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारने लॉकडाऊनचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.
दिल्लीत प्रवासावर निर्बंध
दिल्लीत रात्री 10 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. येत्या 30 एप्रिलपर्यंत ही संचारबंदी असेल. रात्रीच्या संचारबंदीमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. लग्न, अत्यंविधी आणि इतर धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच मेट्रो प्रवास केवळ 50 टक्के क्षमतेनेच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मध्यप्रदेशात लॉकडाऊनचा अवधी वाढवला
मध्यप्रदेशात कोरोना वाढल्याने राज्य सरकारने इंदूर, विदिशा, राजगड, बडवानी आणि शाजपूर जिल्ह्यातील लॉकडाऊनचा कालवधी वाढवून 19 एप्रिल करण्यात आला आहे. तर बालाघाट, नरसिंहपूर, सीवनी आणि जबलपूर जिल्ह्यात 22 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असेल. त्याशिवाय बैतूल, रतलाम, खरगोन आणि कटनीमध्ये 17 एप्रिलपर्यंत सकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.
उत्तर प्रदेशात नाईट कर्फ्यू
उत्तर प्रदेशात लखनऊ, कानपूर आणि वाराणासीत 30 एप्रिलपर्यंत रात्री 9 वाजल्यापासून पहाटे 6 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. मेरठमध्ये 18 एप्रिलपर्यंत सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी असेल. तसेच गाझियाबाद आणि नोएडामध्ये 17 एप्रिलपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे.
राजस्थानात नाईट कर्फ्यू
राजस्थानात अजमेर, अलवर, भीलवाडा, चितौडगड, डुंगरपूर, जयपूर, जोधपूर, कोटा आणि आबू रोड येथे 30 एप्रिलपर्यंत नाईट कर्फ्यू असेल. रात्री 8 वाजल्यापासून ते पहाटे 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी असेल. तर उदयपूरमध्ये संध्याकाळी 6 वाजल्यापासून पहाटे 6 वाजेपर्यंत संचारबंदी असेल.
गुजरातमध्ये संचारबंदी
राज्यातील जामनगर, भावनगर, जुनागढ़, गांधीनगर, आनंद, नडियाद, मेहसाणा, मोरबी, दाहोद, पाटन, गोधरा, भूज, गांधीधाम, भरूच, सुरेंद्रनगर, सूरत, अहमदाबाद, राजकोट, आणि वडोदरा येथे 30 एप्रिलपर्यंत रात्री 8 वाजल्यापासून ते पहाटे 6 वाजेपर्यंत नाइट कर्फ्यू राहणार आहे.
कर्नाटकात 20 एप्रिलपर्यंत संचार बंद
कर्नाटकात बंगळुरू, मैसूर, मंगळुरू, कलबुर्गी, बीदर, तुमकुरु आणि उडुपी-मणिपालमध्ये 20 एप्रिल रोजी रात्री 10 वाजेपर्यंत पहाटे 5 वाजेपर्यंत नाइट कर्फ्यू राहणार आहे.
जम्मू-काश्मीरात संचाराला मज्जाव
जम्मू, श्रीनगर, उधमपूर, बारामूला, कठुआ, अनंतनाग, बडगाम, कुपवाड़ाच्या शहरी भागात रात्री 10 वाजल्यापासून पहाटे 6 वाजेपर्यंत नाइट कर्फ्यू राहणार आहे.
पंजाबात राज्यवापी संचार बंदी
पंजाब सरकारने रात्री 9 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत राज्यव्यापी कर्फ्यू लावला आहे. चंडीगढ़मध्ये रात्री 10.30 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. (These states have announced lockdown and night curfew amid Covid-19 spike)
ओडिशामध्येही संचारबंदी
ओडिशातही 5 एप्रिलपासून सुंदरगड, झारसुगुडा, संबलपूर, बारगड, बोलंगीर, नुआपाडा, कालाहांडी, नवरंगपूर, कोरापूट आणि मलकानगिरीमध्ये रात्री 10 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. (These states have announced lockdown and night curfew amid Covid-19 spike)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 100 SuperFast News | 8 AM | 12 April 2021 https://t.co/cvDoUSh8b3
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 12, 2021
संबंधित बातम्या:
मुंबईत लॉकडाऊन झाला तर काय होणार?; तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे का?
Corona Vaccination : केंद्र सरकारकडून रशियाच्या Sputnik V लसीला मंजुरी, लवकरच लसीकरणाला सुरुवात
Maharashtra corona guidelines for Gudi Padwa : गुढीपाडव्यासाठी राज्य सरकारची नियमावली
(These states have announced lockdown and night curfew amid Covid-19 spike)