Indian tourist Place : भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध सध्या बिघडले आहे. पण याचा सर्वाधिक फटका हा मालदीवलाच बसला आहे. भारतातून सर्वाधिक पर्यटक हे मालदीवला जात होते. पण आता याबाबतीत भारतीयांची संख्या पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपला भेट देण्याचं आवाहन केल्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी त्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर त्यांची मंत्रीपदावरुन हक्कालपट्टी करणार आली होती. पण भारताने यानंतर बायकॉट मालदीव अशी मोहिमच सुरु केली होती. मालदीव हे जगातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे. पण भारतात मालदीवपेक्षाही सुंदर ठिकाण आहे.
राजस्थानमधील बांसवाडा शहरात एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. या शहरात सुमारे 100 बेट आहेत. त्यामुळे या शहराला बेटांचे शहर असेही म्हणतात. माही नदीच्या आत ही लहान बेटे आहेत. राजस्थानसारख्या वाळवंटात देखील पाण्याने वेढलेली ही सुंदर नैसर्गिक बेट आहेत जी पर्यटकांना आकर्षित करतात. माही नदी आणि ही बेटे एकत्र पाहिल्यावर एक अप्रतिम नजारा दिसतो. पावसाळ्यात हे ठिकाण अधिक सुंदर दिसते. त्यावेळी येथे ढग असतात त्यामुळे ते एखाद्या हिल स्टेशनसारखे दिसतात.
हे ठिकाण पाहिल्यास मालदीवमध्ये आल्यासारखे वाटेल. पाण्याच्या आत असलेली छोटी बेटे इतकी सुंदर दिसत आहेत की इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. बांसवाडा हे राजस्थानच्या दक्षिण भागात वसले आहे. ४० किलोमीटर परिसरात वसलेल्या या शहराचे सौंदर्य येथे वाहणाऱ्या माही नदीने आणखीनच वाढवले आहे. तुम्ही दिल्लीत राहत असाल तर एका दिवसात तुम्ही इथे सहज पोहोचू शकता.
तुम्ही या ठिकाणी बोटिंग करण्याचा आनंद घेऊ शकता. अनेक प्रकारचे वन्य प्राणी येथे पाहायला मिळतील. हे ठिकाण पाहिल्यानंतर तुम्हाला आपण राजस्थानमध्ये आहोत असे वाटणारच नाही. अनेकांना अजून या ठिकाणाची माहिती नाही. त्यामुळे येथे फारशी गर्दी होत नाहीय मात्र राजस्थान सरकार आता हे ठिकाण नवीन पर्यटन स्थळ म्हणून विकसित करत आहे.