पाकिस्तानातून आली… मीडियात झळकली, आता लोकसभा निवडणुकीचा प्रचार करणार; ‘या’ पक्षाने दिली ऑफर

| Updated on: Feb 07, 2024 | 3:39 PM

सीमा हैदर हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सीमा हैदर ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. सीमा हैदर हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आता सीमा हैदर ही थेट लोकसभा निवडणूकीमध्ये उतरणार आहे.

पाकिस्तानातून आली... मीडियात झळकली, आता लोकसभा निवडणुकीचा प्रचार करणार; या पक्षाने दिली ऑफर
Follow us on

मुंबई : पाकिस्तानमधून भारतात दाखल झालेली सीमा हैदर ही गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. सीमा हैदर ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसतय. हेच नाही तर रिल्स आणि अनेक खास व्हिडीओ सीमा हैदर हिचे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. सीमा हैदर ही नेपाळ मार्गे भारतामध्ये दाखल झालीये. सचिन मीना याच्यासोबत सीमा हैदर हिने नेपाळमध्ये लग्न केले. सीमा हैदर ही मुळ पाकिस्तानमधील असून ती भारतामध्ये तिच्या मुलांसोबत दाखल झाली. सरकारी यंत्रणेकडून अनेकदा सीमा हैदर हिचे चाैकशी देखील करण्यात आलीये. अनेक आरोपही सीमा हैदर हिच्यावर करण्यात आले.

थेट अयोध्येतील रामललाची प्राणप्रतिष्ठापण सोहळ्याचा प्रचार करताना देखील सीमा हैदर ही दिसली. मध्यंतरी चर्चा होती की, सीमा हैदर ही लवकरच राजकारणात प्रवेश करेल. हेच नाही तर आगामी निवडणूकांसाठी सीमा हैदर ही इच्छुक असल्याच्या देखील चर्चा होत्या. आता यासंदर्भातच एक अत्यंत मोठे आणि महत्वाचे अपडेट पुढे आलंय.

लोकसभा निवडणूकीमध्ये मोठा गेम करताना राष्ट्रीय लोक दल दिसत आहे. नुकताच यासंदर्भात सीमा हैदर हिची भेट देखील घेण्यात आलीये. लोकसभा निवडणूकीमध्ये मथुरामध्ये जिंकण्यासाठी मोठा गेम करताना रालोद दिसत आहे. पाकिस्तानमधून भारतामध्ये दाखल झालेल्या सीमा हैदर हिलाच निवडणूकीमध्ये प्रचारासाठी उतरवण्यात येणार आहे.

रालोदचे प्रदेश उपाध्यक्ष कुंवर नरेंद्र सिंह यांनी सांगितले की, नुकताच आम्ही लोकसभा 2024 साठी सीमा हैदर हिला प्रचारासाठी आमंत्रित केले आहे. विशेष म्हणजे सीमा हैदर हिने प्रचाराला मथुराला येण्यासाठी होकार देखील दिलाय. थोडक्यात काय तर रालोदचा प्रचार करताना आता सीमा हैदर ही दिसणार आहे.

हेच नाही तर सीमा हैदर हिने वृंदावन प्रेम मंदिर बघण्याची इच्छा जाहिर केल्याचे देखील सांगितले जाते. सीमा हैदर ही रालोदचा प्रचार करताना दिसणार हे स्पष्ट आहे. सध्या सीमा हैदर ही केंद्रबिंदू बनली आहे. अनेक लोक हे सीमा हैदर हिला भेटण्यासाठी तिच्या घरी देखील येतात. सीमा हैदर हिचे अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना देखील अनेकदा दिसतात.