Ayodhya: राम मंदिरात लावले जाणार हे विशेष घड्याळ, पाहा का आहे खास

| Updated on: Dec 25, 2023 | 9:11 PM

world clock : राम मंदिराचे उद्घाटन जसे जसे जवळ येत तसे देशभरात उत्साह वाढत आहे. प्रत्येकजण आपापल्यापरीने राम मंदिरासाठी दान देत आहे. यामध्ये आता लखनौ येथील भाजी विक्रेते अनिल कुमार साहू यांनी राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना पेटंट वर्ल्ड क्लॉक सुपूर्द केले आहे.

Ayodhya: राम मंदिरात लावले जाणार हे विशेष घड्याळ, पाहा का आहे खास
ram mandir
Follow us on

Ram Mandir Inauguration : राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी रोजी होणार आहे. तर २५ जानेवारीपासून मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे. राम मंदिर उद्घाटनाबाबत देशभरात उत्साहाचे वातावरण आहे.  अनेकांनी राम मंदिरासाठी काही ना काही दान दिले आहे. यातच आता लखनऊ येथील भाजी विक्रेते अनिल कुमार साहू यांनी राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडे पेटंट जागतिक घड्याळ सुपूर्द केले आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे घड्याळ एकाच वेळी 9 देशांची वेळ सांगते.

हे घड्याळ राम मंदिर, अयोध्या जंक्शन आणि हनुमानगढी मंदिराला समर्पित करण्यात आले आहे. यामध्ये नऊ देशांचा काळ एकाच वेळी दिसतो. राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडे हे घड्याळ सुपूर्द करण्यात आले आहे.

अनिल कुमार साहू लखनऊमध्ये भाजीविक्रेते म्हणून काम करतात. हे घड्याळ भारत, मेक्सिको, जपान, दुबई, टोकियो, मेक्सिको सिटी, वॉशिंग्टन या सारख्या नऊ देशांतील शहरांची वेळ सांगते.

उत्तर प्रदेश सरकार अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या कामाची सतत पाहणी करत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत पोहोचून राम मंदिराच्या उभारणीच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.