तृणमूल काँग्रेसचा नेता ‘तिला’ भर गर्दीत अमानुषपणे मारत राहिला, गर्दी पाहत राहिली, अतिशय संतापजनक

| Updated on: Jun 30, 2024 | 7:59 PM

मारहाण करणाऱ्या टीएमसी नेत्याला संबंधित परिसरात जेसीबी म्हणून ओळखलं जातं. त्याचं खरं नाव तजेमुल असं आहे. तो आमदार हमीदूर रहमान यांचा निकटवर्तीय मानला जातो. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा जेसीबी चोपडा आमदाराच्या जवळचा असल्याने उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील चोपडा ब्लॉकच्या लक्ष्मीपूर ग्रामपंचातीचा तो सर्वेसर्वा आहे. या जेसीबीच्या विरोधात कुणीही स्थानिक नागरीक कॅमेऱ्यासमोर त्याच्याबाबत बोलायला तयार नाही.

तृणमूल काँग्रेसचा नेता तिला भर गर्दीत अमानुषपणे मारत राहिला, गर्दी पाहत राहिली, अतिशय संतापजनक
Follow us on

पश्चिम बंगालच्या चोपडा परिसरात एका तरुण-तरुणीला उघडपणे मारहाण करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन भाजपचे नेता अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जी सरकारवर सडकून टीका केली आहे. अमित मालवीय यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत टीएमसी नेता तरुण-तरुणीला भर रसत्त्यात प्रचंड मारहाण करताना दिसत आहे. संबंधित व्हिडीओची ‘टीव्ही 9 मराठी’ पुष्टी करत नाही. पण हा व्हायरल होणारा व्हिडीओ खरोखरंच फार धक्कादायक आहे. या प्रकरणात टीएमसी नेत्याकडून मारहाण करण्यात येणाऱ्या तरुण आणि तरुणीवर विवाहबाह्य संबंधांचा आरोप आहे. संबंधित व्हिडीओत टीएमसी नेता छडीने तरुणीला अतिशय अमानवीयपणे मारहाण करताना दिसतो. त्यानंतर तो तरुणालाही मारहाण करतो. यानंतर तो पुन्हा तरुणीचे केस पकडतो आणि तिला मारहाण करताना दिसतो.

या व्हिडीओत मारहाण करणाऱ्या टीएमसी नेत्याला संबंधित परिसरात जेसीबी म्हणून ओळखलं जातं. त्याचं खरं नाव तजेमुल असं आहे. तो आमदार हमीदूर रहमान यांचा निकटवर्तीय मानला जातो. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा जेसीबी चोपडा आमदाराच्या जवळचा असल्याने उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील चोपडा ब्लॉकच्या लक्ष्मीपूर ग्रामपंचातीचा तो सर्वेसर्वा आहे. या जेसीबीच्या विरोधात कुणीही स्थानिक नागरीक कॅमेऱ्यासमोर त्याच्याबाबत बोलायला तयार नाही. इतकी त्याची दहशत आहे. गावातील सर्वजण घाबरले आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर काय माध्यमांसमोरही टीएसी नेता जेसीबी बद्दल बोलायला तयार नाहीत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जेसीबीच्या विरोधात अनेक हत्येचे गुन्हे दाखल आहेत.

व्हिडीओ काढणारा गाव सोडून निघून गेला

याच टीएमसी नेते जेसीबीवर एका तरुण-तरुणीला भर रस्त्यावर मारहाण करण्याचे आरोप आहेत. विशेष म्हणजे मारहाण करतानाच्या व्हिडीओत तो तरुणीला अतिशय अमानुषपणे मारताना दिसत आहे. तो मारहाण करताना आधी कुणीही तरुण-तरुणीला वाचवण्यासाठी येताना दिसत नाहीत. नंतर काहीजण तिथे येतात. पण तेसुद्धा तरुण-तरुणीला वाचवण्यात यशस्वी होत नाहीत. हा व्हिडीओ ज्याने कॅमेऱ्यात कैद केलाय त्याने चोरुन तयार केला आहे. व्हिडीओ बनवणारा आता घाबरुन गावाच्या बाहेर पळून गेला आहे. अनेक लोकांनी हा व्हिडीओ पोस्ट केला होता. पण त्यांच्यावर कथितप्रमाणे दबाव आणल्यामुळे त्यांना व्हिडीओ डिलिट करावा लागला आहे.

भाजप नेत्याने उपस्थित केले प्रश्न

या घटनेनंतर भाजप नेते अमित मालवीय यांनी संबंधित व्हिडीओ ट्विट करत पश्चिम बंगाल सरकारवर निशाणा साधला आहे. “व्हिडीओत जो व्यक्ती महिलेला मारहाण करतोय त्याचं नाव तजेमुल (परिसरात जेसीबी नावाने प्रसिद्ध) आहे. तो त्याच्या सो कॉल्ड न्याय सभेच्या माध्यमातून त्वरित न्याय देण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच तो चोपडाचे आमदार हमीदूर रहमान यांच्या जवळच आहे”, असं अमित मालवीय यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

“टीएमसी पक्षाद्वारे चालवल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमधील शरिया न्यायालयाच्या वास्तवाची भारताला जाणीव व्हायला हवी. इथे प्रत्येक गावात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या महिलांसाठी शाप आहेत. बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा मागमूसही नाही. ममता बॅनर्जी या राक्षसावर कारवाई करतील की शेख शहाजहानप्रमाणे त्याचा बचाव करतील?”, असा सवाल अमित मालवीय यांनी केला आहे.

चोपडाचे आमदार हमीदूर रहमान यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. “मी हा व्हिडिओ व्हॉट्सॲपवर पाहिला. 1 तासापूर्वी व्हिडिओ पाहिला. मी जेसीबीला बोलावलं आहे”, असं हमीदूर रहमान म्हणाले. भाजप खासदार शमिक भट्टाचार्य यांनीदेखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली. “बंगालमध्ये अशा अनेक घटना आहेत. मात्र गुन्हे दाबले जातात. बारासातच्या एका मुलाने दुसऱ्या धर्माच्या मुलीशी लग्न केले. एक वर्षाच्या मुलाला भेटण्यासाठी तो सासरच्या घरी गेला असता त्याला जिवंत जाळण्यात आले. व्हॅन चालकाने त्याला नर्सिंग होममध्ये नेले. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात सुरू आहे. अशा घटना घडत आहेत”, असं शमिक भट्टाचार्य यांनी सांगितलं.