कोलकाता: पश्चिम बंगालच्या विधानसभेत (Bengal Assembly) आज प्रचंड राडा झाला आहे. भाजप आणि टीएमसीच्या आमदारांमध्ये (TMC MLA) विधानसभेतच तुफान हाणामारी झाली. आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेले. एकमेकांचे कपडे फाडले. या हल्ल्यात टीएमसीचे आमदार असित मजुमदार जखमी झाले असून त्यांना कोलकाताच्या पीजी रुग्णालयातील वुडनवर्ड वॉर्डात भरती करण्यात आलं आहे. टीएमसीचे आमदार शौकत मोल्ला आणि महिला आमदार महिलांनी विधानसभेच्या सुरक्षा रक्षकांच्या साथीने भाजपच्या आमदारांवर हल्ला चढवल्याचा आरोप भाजप नेते शुभेंद्रू अधिकारी यांनी केला आहे. आमदार मनोज टिग्गा यांचे कपडे फाडण्यात आले आहेत. तर नरहरी महतो यांना जमिनीवर पाडून मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हाणामारी झाली त्यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या सभागृहात नव्हत्या. त्या दौऱ्यावर आहेत. मात्र, या घटनेची त्यांना संपूर्ण माहिती देण्यात आली असून सभागृहातील राड्यावर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
बंगाल विधानसभेचे अध्यक्ष बिमान बॅनर्जी यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. जे काही झालं ते दुर्देवी आहे. आमदार विधानसभेच्या नियमांचा अभ्यास करत नाहीत. त्यांना विधानसभेचं महत्त्व कळत नाही. विधानसभेत हंगामा करणं हाच त्यांचा हेतू आहे, असं बिमान बॅनर्जी यांनी सांगितलं.
आज सकाळी सभागृह सुरु होताच भाजप आमदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. विरोधी पक्षनेते आणि भाजपचे आमदार शुभेंद्रू अधिकारी यांनी बीरभूम नरसंहाराप्रकरणी करण्यात आलेल्या मदतीची घोषणा विधानसभेच्या बाहेर का केली? विधानसभेत मदतीची घोषणा का केली नाही? असा सवाल विधानसभा अध्यक्षांना केला. अधिकारी यांच्या या सवालानंतर या हत्याकांडावर विधानसभेत चर्चा घडवून आणण्याची भाजपने जोरदार मागणी केली.
मात्र, विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे भाजप आमदार वेलमध्ये उतरले. त्यावर विधानसभा अध्यक्ष भडकले. तुम्ही रोज काही ना काही बहाना शोधून विनाकारण विधानसभेत हंगामा करत असता. अचानक या गोष्टी करण्याचं काहीच औचित्य नाहीयेस, असं विधानसभा अध्यक्ष बिमान बनर्जी म्हणाले. मात्र, भाजप आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून वेलमध्ये उतरून जोरजोरात नारेबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे तृणमूलचे आमदारही वेलमध्ये उतरले. त्यामुळे दोन्ही सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि त्याचं पर्यावसान हाणामारीत झालं.
Absolute pandemonium in the West Bengal Assembly. After Bengal Governor, TMC MLAs now assault BJP MLAs, including Chief Whip Manoj Tigga, as they were demanding a discussion on the Rampurhat massacre on the floor of the house.
What is Mamata Banerjee trying to hide? pic.twitter.com/umyJhp0jnE
— Amit Malviya (@amitmalviya) March 28, 2022
संबंधित बातम्या:
महाराष्ट्रात 2024 ला बहुमताचं सरकार येणार, Devendra Fadnavis यांचा गोव्यातून मविआला इशारा
Punjab: ‘मान’लं पाहिजे! पंजाबमध्ये थेट घरात राशन येणार, भगवंत मान सरकारचा मोठा निर्णय