कोलकाता : राम मंदिराबद्दल एका आमदाराने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्याने राम मंदिराला अपवित्र स्थान म्हटलय. कुठल्याही हिंदूने पूजेसाठी राम मंदिरात जाऊ नये, असही या आमदाराने म्हटलं आहे. आमदाराच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. रामेंदु सिन्हा असं या आमदाराच नाव आहे. तारकेश्वर येथून येणारे ते तृणमुल काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. रामेंदु सिन्हा यांच्या वक्तव्याचा चहूबाजूंनी निषेध होतोय.
बंगाल भाजपाचे नेते सुवेंदु अधिकारी यांनी रामेंदु सिन्हा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “या अपमानास्पद वक्तव्याची मी फक्त निंदा करत नाही, तर जगभरातील हिंदुंच्या भावना दुखावल्याबद्दल या व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदवण्याची तयारी करत आहे” असं सुवेंदु अधिकारी यांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म X वर म्हटलय.
अजून काय म्हटलय?
“तृणमुल काँग्रेसचे नेते असेच आहेत. हिंदूंवर आक्रमण करण्याची त्यांची हिम्मत इतकी वाढली आहे की, आता ते भगवान श्री राम यांच्या भव्य मंदिराला अपवित्र ठरवत आहेत” अशा शब्दात सुवेंदु अधिकारी यांनी टीएमसीवर हल्लाबोल केला. तारकेश्वरचे आमदार रामेंदु सिन्हा रॉय यांनी भव्य राम मंदिराला अपवित्र ठरवलय. कुठल्याही भारतीय हिंदूने अशा अपवित्र स्थळाची पूजा करु नये, असं त्यांनी म्हटलय.
यह है तृणमूल कांग्रेस के नेताओं की सच्चाई। हिन्दुओं पर आक्रमण करते करते उनकी हिम्मत इतनी बड़ गई है कि वह अब भगवान श्री राम के भव्य मंदिर को ‘अपवित्र’ बताने की धृष्टता कर रहे हैं।
तारकेश्वर विधानसभा क्षेत्र के विधायक – रामेंदु सिन्हा रॉय, जो आरामबाग संगठनात्मक जिले के टीएमसी… pic.twitter.com/RZ95yPDY5V
— Suvendu Adhikari (Modi Ka Parivar) (@SuvenduWB) March 4, 2024
एफआयआर नोंदवणार
सुवेंदु अधिकारी म्हणाले की, मी त्यांच्या या अपमानास्पद वक्तव्याचा फक्त निषेधच करत नाही, तर जगभरातील हिंदुंच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवणार आहे. रामेंदु सिन्हा आरामबाग संघटनात्मक जिल्ह्याचे टीएमसी अध्यक्ष आहेत.