आजचा दिवस ऐतिहासिक आहे. कारण आजच्याच दिवशी 50 वर्षापूर्वी भारताना पाकिस्तानला युद्धात पराजीत केलं होतं. त्याच युद्धातून बांगलादेशची निर्मिती झाली. बांगलादेश युद्ध हे भारतीय सैनिकांचं साहस, शौर्य आणि नैतिकेचं प्रतिक मानलं जातं. उठसुठ भारतासोबत कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानचे त्यादिवशी दोन शकलं पडली होती. पूर्व पाकिस्तान मुक्त झाला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींसह लष्करप्रमुख जनरल माणेकशा यांच्याही धडाडीच्या निर्णयाच्या सुरस कथा अजूनही सांगितल्या जातात. हा दिवस भारत-बांगलादेशमध्ये विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतीय सैनिकांच्या वीरतेला सलाम करण्याचा हा दिवस आहे. ह्या एका घटनेवरच भारत आणि बांगलादेश यांच्यातले संबंध अतूट ठरलेले आहेत.
President Ram Nath Kovind attended a banquet hosted in his honour by President Abdul Hamid of Bangladesh. The President also witnessed a cultural programme organised on the occasion. pic.twitter.com/EnX3V6KrIX
— President of India (@rashtrapatibhvn) December 15, 2021
पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून सन्मान
बांगलादेशच्या निर्मितीचं हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्यासाठी बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे ह्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी बांगलादेशच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच काल त्यांनी बांगलादेशचे राष्ट्रपती अब्दूल हमिद यांची भेट घेतली. कोविंद यांच्या सन्मानार्थ बांगलादेशच्या राष्ट्रपतींनी भोजनाचं आयोजन केलं होतं. तसच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्याशीही राष्ट्रपती कोविंद यांनी द्विपक्षीय मुद्यावर चर्चा केली. बांगलादेशच्या स्वातंत्र्याबद्दल कोविंद यांनी शुभेच्छा दिल्या.
Sharing more pictures from the historic 1971 war. #SwarnimVijayVarsh pic.twitter.com/7Lwa6Z0t1t
— Rajnath Singh (@rajnathsingh) December 16, 2021
भारतातही बांगलादेश निर्मितीनिमित्त काही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी 10.30 वा. नॅशनल वॉर मेमोरियलवर पोहोचून कार्यक्रमात सहभागी होतील. बांगलादेशची राजधानी ढाक्यात राष्ट्रपती कोविंद हे विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले. संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनीही 1971 च्या वीरांची आठवण काढत, त्यावेळेसच्या युद्धाचे काही फोटोज शेअर केले.
13 दिवस चाललं युद्ध
भारताची फाळणी झाली. त्यात पाकिस्तान वेगळा देश निर्माण झाला. मुस्लिमबहुल भाग हा पाकिस्तान म्हणून उदयाला आला. त्यातही पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन भाग होते. पश्चिम पाकिस्तान म्हणजे आताचा भाग, त्यांनी पूर्व पाकिस्तानवर पहिल्यापासूनच दुजाभाव केला. परिणामी पूर्व पाकिस्तानमध्ये पश्चिम पाकिस्तानबद्दल खदखद निर्माण झाली. शेवटी 1971 मध्ये पूर्व पाकिस्तानातल्या जनतेनं उठाव केला. शेख मुजीबूर रहमान यांच्या नेतृत्वाखाली तो यशस्वी केला. भारतानं पूर्व पाकिस्तानच्या बाजूनं वजन टाकलं. 3 डिसेंबर 1971 रोजी युद्धाला सुरुवात झाली. हे युद्धा 13 दिवसांपर्यंत चाललं. यात भारताच्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सनं पाकिस्तानला चारीमुंड्याचीत केलं. तत्कालीन भारतीय लष्कर प्रमुख सॅम माणेकशा यांच्या नेतृत्वाखाली भारतानं निर्णायकी कामगिरी पार पाडली. ढाक्यात 93 हजार पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय लष्करासमोर सरेंडर केलं. पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. बांगलादेश नावाचा नवा देश उदयाला आला.
हे सुद्धा वाचा:
अत्यंत कमी दरामध्ये नवी मुंबईकर करू शकणार मेट्रोने ‘गारेगार’ प्रवास, जाणून घ्या तिकिट दर…
MBBS ची विद्यार्थिनी दोन आठवड्यांपासून मुंबईतून बेपत्ता, ‘त्या’ सेल्फीतला तरुण म्हणतो…
दारू दिली नाही म्हणून मित्रानेच चिरला मित्राचा गळा; आरोपीला अटक, इचलकरंजीमधील धक्कादायक घटना