Tomato Price : टोमॅटोच्या भावाने ग्राहक लालबुंद! किंमतींनी केला कहर

| Updated on: Jun 28, 2023 | 2:31 PM

Tomato Price : यापूर्वी देशात लाल चिखल पाहिला होता. टोमॅटोचा भाव उतरल्याने ते रस्त्यावर फेकून देण्यात आले होते. पण आता देशभरात लाल टोमॅटोचा भाव ऐकून ग्राहकांचे चेहरे लाले लाल होत आहे. भाव तर सर्वदूर गगनाला भिडले आहेत.

Tomato Price : टोमॅटोच्या भावाने ग्राहक लालबुंद! किंमतींनी केला कहर
Follow us on

नवी दिल्ली : भाजी मंडईत टोमॅटोच्या भावाने (Tomato Price) कहर केला आहे. देशभरात टोमॅटोने ग्राहकांच्या चेहऱ्यावरचे हसू गायब केले आहे. दिल्ली-नोएडातच नाही तर, उत्तर प्रदेश, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेशासह महाराष्ट्रात टोमॅटो भाव खाऊन गेले आहे. टोमॅटोचे भाव गडगडल्यानंतर देशाने अनेक ठिकाणी लाल चिखल पाहिला होता. पण यावेळी टोमॅटोचा भाव ऐकूनच ग्राहकांचे चेहरे लालबुंद होत आहे. टोमॅटो हा सर्वांचाच विक पॉईंट आहे. टोमॅटोचे भाव अचानक गगनाला भिडल्याने ग्राहकांपुढे प्रश्न पडला आहे. महागाईचा कहर सुरु असतानाच टोमॅटोने पण या आगीत तेल ओतले आहे.

असा वाढला भाव
काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशसह महाराष्ट्रात टोमॅटो 2-8 रुपये किलो होते. पण पावसाळ्याच्या तोंडावरच किंमतींनी जोर पकडला. भाव एकदम गगनाला भिडले. सुरुवातीला 80 रुपये किलो दराने टोमॅटो विक्री झाले. आता तर काही भागात टोमॅटोचा दर 100-120 रुपये प्रति किलोवर पोहचला. त्यामुळे सहाजिकच किचनच्या बजेटवर ताण आला आहे. पूर्वी दोन तीन किलो टोमॅटो घेऊन जाणारा ग्राहक आता एक पाव टोमॅटो घेत आहे.

दरवर्षीची कथा
टोमॅटोच्या किंमती यापूर्वी पण वाढल्या आहेत. दरवर्षी एकदा टोमॅटोने ग्राहकांचा खिसा कापला आहे. पण त्याचा शेतकऱ्यांना किती फायदा झाला ते कोडचं आहे. गेल्यावर्षी 2022 मध्ये टोमॅटोचे दर याच महिन्यात 60-70 रुपये किलो, 2021 मध्ये 100 रुपये तर 2020 मध्ये एक किलो टोमॅटोचा दर 70-80 रुपये किलो होता.

हे सुद्धा वाचा

दरवाढीचे नेमके कारण काय
व्यापाऱ्यांच्या मते, बाजाराता टोमॅटोचा तुटवडा आहे. टोमॅटोची आवक घटली आहे. माल कमी येत आहे. मागणी जास्त असून आवक कमी आहे. महाराष्ट्रातून टोमॅटोचा देशभरात जातो. तो अवघ्या 20 टक्क्यांवर आला आहे. तर काही ठिकाणी काळाबाजार होत असल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात येत आहे. पण भाव केवळ मेट्रो शहरातच वाढले आहेत, असे नाही, निम शहरात, तालुक्याच्या पातळीवर आणि खेड्यातील बाजारात पण टोमॅटोचे भाव वाढले आहेत.

आवक कशामुळे घटली

  • यंदा उन्हाळ्यात कडक ऊन आणि अवकाळी पावसाने टोमॅटो पिकाचं नुकसान झालं
  • काही दिवसांपूर्वी टोमॅटोला भाव मिळत नसल्याने तो फेकून देण्याची वेळ आली होती
  • भावात अचानक आलेल्या वाढीचा शेतकऱ्यांना कितपत फायदा मिळतो हे कोडेच
  • भारतात कृषी उत्पादनं सुरक्षित ठेवण्याची तरतूद अथवा व्यवस्था नसल्याने परिणाम
  • त्यामुळे ग्राहकांना प्रत्यके ऋतूत भाजीपाला कमी-जास्त दराने खरेदी करावा लागतो