मुंडावळ्या बांधता बांधता नवरदेवाला आला हार्ट अटॅक; वराती ऐवजी घरातूनच निघाली…

| Updated on: May 31, 2023 | 9:42 AM

उत्तर प्रदेशात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. एका तरुणाला लग्नाच्या दिवशीच हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. ज्या घरातून त्याची वरात निघायची तिथून त्याची अंत्ययात्रा निघाली. त्यामुळे संपूर्ण गावच हळहळ व्यक्त करत आहे.

मुंडावळ्या बांधता बांधता नवरदेवाला आला हार्ट अटॅक; वराती ऐवजी घरातूनच निघाली...
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बहराइच : उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक, दुर्देवी आणि तितकीच वेदनादायी घटना घडली आहे. लग्नाची वरात निघणार होती. त्यामुळे मुंडावळ्या बांधत असतानाच नवरदेवाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. पोटचा गोळा गेल्याची बातमी ऐकून नवरदेवाच्या आईवडिलांनी आणि कुटुंबीयांनी हंबरडाच फोडला. जिथून वरात निघायची होती, त्या ठिकाणाहून नवरदेवाची अंत्ययात्रा निघाली. या दुर्देवी घटनामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

जरवल रोड क्षेत्र परिसरातील अटवा गाव येथील ही घटना आहे. रामलाल यांचा मुलगा राजकमल याचं काल लग्न होतं. क्योलीपरवा अटैसा गावात त्याच्या लग्नाची वरात जाणार होती. त्यामुळे घरात लग्नाची संपूर्ण तयारी झाली होती. हळदीचा कार्यक्रमही दणक्यात झाला होता. पै पाहूणेही लग्नाला आले होते. आता थोड्याच वेळात राजकमलची वरात निघणार होती. त्यामुळे राजकमलचा मेकअप करण्यात येत होता. त्याला लग्नाचे कपडेही घालण्यात आले होते. त्यानंतर राजकमलच्या डोक्याला मुंडावळ्या बांधल्या जात होत्या. मुंडावळ्या बांधत असतानाच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे तो खाली कोसळला.

हे सुद्धा वाचा

आक्रोश आणि मातम

राजकमल खाली कोसळल्याने त्याला तात्काळ उचलून मुस्तफाबाद सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच राजकमलला मृत घोओषित करण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेमुळे ज्या घरात लग्नाचा जल्लोष होता तिथे रडारड आणि आक्रोश सुरू झाला. ही धक्कादायक माहिती मिळताच वधूच्या घरचे लोकही राजकमलच्या घरी पोहोचले.

वडील कोलमडले

अशी धक्कादायक घटना घडेल याची कुणालाही कल्पना नव्हती. राजकमल याचा मृत्यू झाल्याने त्याच्या लग्नासाठी आलेल्या नातेवाईकांना त्याच्या अंत्ययात्रेत सामील होण्याची वेळ आली. अत्यंत दु:खद अंतकरणाने सर्वांनी राजकमलला अखेरचा निरोप दिला. मुलाच्या निधनाने रामलाल कोलमडून गेले आहेत. रडून रडून त्यांचे हाल झाले आहेत. हाच दिवस पाहायचा बाकी होता का? आज मुलगा असता तर घरात आनंदाचं वातावरण असतं, असं ते म्हणत आहेत.