इंदूर, दि. 18 फेब्रुवारी 2024 | भीक मागणे हा आपल्या देशात गुन्हा आहे. भिक्षा प्रतिबंधक कायदा १९५९ नुसार एखादी व्यक्ती भीक मागताना सापडल्यास पोलिसांनी त्यास पकडून न्यायालयासमोर हजर करावे लागते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने संबंधित व्यक्तीचे पुनर्वसन करण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. परंतु त्यानंतर अनेक रस्त्यांवर भिकारी दिसत असतात. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भीक मागण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. एका महिलेने केवळ 45 दिवसांत भीक मागून लाखो रुपये कमवले आहे. तिला पकडल्यावर जी माहिती मिळाली त्यानंतर अधिकारी थक्क झाले आहेत.
जिल्हाधिकारी आशीष सिंह यांनी इंदूर शहर भिकारी मुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार भिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. यामुळे इंदूरमध्ये भिकाऱ्यांवर कारवाई सुरु झाली. इंदूरमधील लवकुश चौकात इंदिरा नावाची महिला तिच्या मुलीसोबत भीक मागत होती. तिला पकडल्यावर तिने सांगितले की, 45 दिवसांत 2.5 लाख रुपये कमवले आहे. ती अधिकाऱ्यांना म्हणाली, मी भीक मागतेय, चोरी नाही करत. भिक्षा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
इंदिराने 45 दिवसांत अडीच लाख रुपये कमवले. तिचा हिशोब तिने सांगितला. आपल्या सासू आणि सासऱ्यांना एक लाख रुपये पाठवले. 50 हजारांची एफडी मुलांच्या नावावर केली आहे. 50 हजार रुपये बँकेत टाकले आहे. 50 हजार रुपये स्वत:कडे खर्च करण्यासाठी ठेवले आहे. कोर्टाने आता महिलेस कारागृहात पाठवले आहे. तर तिच्या मुलीस बाल सर्वेक्षण गृहात ठेवले आहे.
महिलेच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. 20 हजार रुपये किंमतीचा स्मार्टफोन तिच्याकडे आहे. तिच्या नावावर बाईक आहे. गाडीचा परवानाही तिच्याकडे आहे. तिची पती आणि तीन मुलेही भीक मागतात. प्रत्येकाची कामाई त्याच्याकडेच असते. इंदिरावर कारवाई झाल्याचे समजताच तिचा पती अमरलाल दोन मुलांसोबत राजस्थानमध्ये पसार झाला. ते राजस्थामधील कलमंडा गावाचे रहिवाशी आहे. गावात शेती आणि पक्के घर आहे. त्यानंतर हे कुटुंब भीक मागण्याचे काम करते. इंदिराला पाच मुले आहेत. तीन मुले आणि पती इंदूरमध्ये थांबले होते. दोन मुले गावात राहत होते. गेल्या आठ वर्षांपासून ते भीक मागत आहेत.
हे ही वाचा
भारतातील हा कोट्यधीश भिकारी, पुणे-मुंबईत बंगला, मुले कॉन्वेंट शाळेत