मुबंई – बेस्ट ची 2100 इलेक्ट्रिक बसेस आणि एसटी महामंडळाकडून 100 बसेसची ऑर्डर मिळालेली असतानाच ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OLECTRA) ला 300 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्यासाठी TSRTC कडून नवी ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरची किंमत अंदाजे 500 कोटी रुपये आहे. भारत सरकारच्या FAME-II योजनेअंतर्गत 300 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्याचा ही मागणी आहे. या 300 ई-बस 12 वर्षांसाठी ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (GCC)/OPEX) मॉडेलच्या आधारावर पुरवल्या जातील. EVEY या बसेस Olectra Greentech Limited (“OLECTRA“) कडून खरेदी करेल, 20 महिन्यांच्या कालावधीत त्या वितरित केल्या जातील. कराराच्या कालावधीत ऑलेक्ट्रा या बसेसची देखभाल करणार आहे.
सध्या, EVEY आणि Olectra Greentech Limited देशातील विविध राज्य परिवहन उपक्रम (STU) मध्ये इलेक्ट्रिक बस चालवत आहेत, पुणे (PMPML), मुंबई (BEST), गोवा, डेहराडून, सुरत, अहमदाबाद, सिल्वासा आणि नागपूर इत्यादी ठिकाणी या बसेस यशस्वीरित्या कार्यरत आहेत.
या 12-मीटर, एकमजली नॉन-एसी बसेसची आसन क्षमता 35+ व्हील चेअर आणि चालक अशी आहे. इलेक्ट्रॉनिक नियंत्रित एअर सस्पेंशन बसेसमध्ये आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, प्रत्येक आसनासाठी एक आपत्कालीन बटण आणि यूएसबी सॉकेट्स आहेत. बसमधील लिथियम-आयन (ली-आयन) बॅटरी रहदारी आणि प्रवासी लोड यावर आधारित 80% SOC वर एका चार्जवर सुमारे 200 किमी प्रवास करू शकते. रिजनरेटिव्ह ब्रेकींग सिस्टम या बसमध्ये आहे. तसेच हाय-पॉवर डीसी चार्जिंग सिस्टम 5 तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण बॅटरी चार्ज करते.
• 300 ई-बससाठी TSRTC कडून LoA प्राप्त .
• या नवीन खरेदीचे मूल्य अंदाजे रु. 500 कोटी
• पुढील 20 महिन्यांत या बसेसचा पुरवठा करणे अपेक्षीत
(हेडलाईन व्यतिरीक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.)