Tv9 Bangla nakshatra Award : TV9 ने संपूर्ण देशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या अनुषंगाने अखेर बंगालच्या अभिमानाची झलकही सर्वांसमोर आली. TV9 कन्नडचा प्रमुख कार्यक्रम ‘नव नक्षत्र सन्मान’ हा दक्षिणेतील अतिशय लोकप्रिय असलेला कार्यक्रम आता TV9 बांग्ला ने आणला आहे. हा एक प्रकारचा विशेष कार्यक्रम आहे जो ‘नक्षत्र सन्मान’ म्हणून खूप लोकप्रिय आहे. यामध्ये समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत व्यक्तींचा गौरव केला जातो.
हा एक अनोखा कार्यक्रम आहे जिथे निवडक व्यक्तींना त्यांच्या आयुष्यभरातील कामगिरीबद्दल सन्मानित केले जाते, त्याला ‘विशेष सन्मान’ असे नाव देण्यात आले आहे. याशिवाय समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना आणखी एक ‘नक्षत्र सन्मान’ दिला जातो.
या वर्षी पुरस्कारासाठी निवडलेल्यांमध्ये – साहित्य जगतातील शिरशेंदू मुखोपाध्याय, क्रीडा क्षेत्रातील झुलन गोस्वामी, कला क्षेत्रातील जोगेन चौधरी, संगीत क्षेत्रातील अजय चक्रवर्ती, सिनेक्षेत्रातील शाबित्री चॅटर्जी यांचा समावेश आहे. समाजसेवेसाठी रामकृष्ण मिशन, विज्ञान आणि अवकाश क्षेत्रातील अमिताव घोष, उद्योग क्षेत्रातील चंद्रशेखर घोष, कला आणि साहित्य क्षेत्रातील जॉय गोस्वामी, बँकिंग आणि अर्थव्यवस्थेतील संजीव सन्याल, क्रीडा क्षेत्रातील सौरव गांगुली आणि इतर लोकांचा सन्मान करण्यात आला.
TV9 Bangla ने समाजातील त्या 5 सुपरवुमनची ओळख करून त्यांचा सन्मान करण्याचे काम केले आहे, ज्यांच्या कार्याची त्यांच्या हयातीत कोणतीही चर्चा झाली नाही. असे असूनही त्यांनी समाजात दुष्कृत्यांचा पराभव करण्याची अतुल्य छाप सोडली आहे. अशा महिलांचे वर्णन महिला समाजाच्या खरे प्रेरणास्थान असे केले आहे.
भारतातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, TV9 नेटवर्कचा नव नक्षत्र सन्मान हा दक्षिणेतील प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक चर्चेचा कार्यक्रम ठरला आहे. या कार्यक्रमाचे सादरीकरण अतिशय अनोखे आहे, ज्याने गेल्या काही वर्षांत भारतातील विविध क्षेत्रातील प्रतिभांना ओळखले आणि त्यांचा गौरव केला. या उपक्रमाचे हे ५ वे वर्ष आहे. या माध्यमातून संस्था या दशकात मैलाचा दगड प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.