नवरात्रीच्या पर्वावर दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये टीव्ही9 फेस्टिव्हल ऑफ इंडिया सुरू झाला आहे. आज या फेस्टिव्हलचा तिसरा दिवस आहे. पाच दिवस हा फेस्टिव्हल चालणार आहे. गेल्या तीन दिवसात हजारो लोकांनी या फेस्टिव्हलला हजेरी लावली आहे. या काळात हजारो रुपयांची उलाढालही झाली आहे. स्टॉलधारकांचा चांगलाच आर्थिक नफा झाला आहे. तर ग्राहकांना अत्यंत महत्त्वाच्या देशविदेशातील दुर्मीळ वस्तू घेता आल्या आहेत. तसेच नानाविध पदार्थांवर तावही मारता आला आहे. आज फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी संधी पूजा आणि भोग आरतीसह महा अष्टमी साजरी केली जाणार आहे.
महा अष्टमीचा दिवस भक्तांसाठी अत्यंत खास आहे. कारण आजच्या दिवशी संधी पूजा केली जाते. ही पूजा नवरात्रीची अष्टमी आणि नवमीच्या दरम्यान केली जाते. संधी पूजा अष्टमी तिथीचं संपणं आणि नवमी तिथी सुरू होत असताना केली जाते. या पाच दिवसात फेस्टिव्हलमध्ये अनेक गोष्टी आकर्षणाच्या असणार आहेत.
फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये संधी पूजेनंतर भोग आरती करण्यात येणार आहे. माँ दुर्गेला स्वादिष्ट भोजनाचा भोग लावला जाणार आहे. हा भोग कृतज्ञता आणि भक्तीचं प्रतिक मानला जातो. या दिवशी प्रत्येकाच्या मनात गहन अध्यात्मिक उत्साह असतो. त्यात भक्त देवीला सन्मानित करण्यासाठी प्रार्थना, अनुष्ठान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सहभागी होतात. टीव्ही9च्या फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये आज दिवसभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. संध्याकाळी दांडिया आणि गरबा नाईटच्याशिवाय ढाक आणि धुनुची नृत्य स्पर्धाही होणार आहे.
दांडिया/गरबा नाईट: आज संध्याकाली 6:30 वाजता दांडिया आणि गरबा नाईटचं आयोजन होणार आहे. या दरम्यान पारंपरिक नृत्य आणि अप्रतिम संगीत प्रत्येकाचं मन मोहून घेणार आहे.
ढाक आणि धुनुची नृत्य स्पर्धा : रात्री 8 ते 9:30 वाजेपर्यंत एका आणखी संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
टीवी9 के फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या मेगा लाइफस्टाइल एक्सपोमध्ये अनेक देशांचे 250 हून अधिक स्टॉल लागले आहेत. TV9 नेटवर्कने आयोजित केलेला हा भव्य फेस्टिव्हल 13 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. टीव्ही9 फेस्टिव्हल ऑफ इंडियात ग्लोबल लाइफस्टाईलच्या ट्रेंडसची तुम्हाला ओळख होईल. तसेच या ठिकाणी तुम्ही अनेक अॅक्टिव्हिटीजचा आनंद लुटू शकता. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय प्रदर्शने भरली आहेत. तसेच खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. या ठिकाणी प्रत्येकासाठी काही ना काही आहेच. 250 हून अधिक स्टॉल लागले आहेत. फॅशनपासून ते घरातील सजावटीच्या सामानापर्यंत, औषधांपासून ते कपड्यांपर्यंत आणि खाद्यपदार्थांपासून संगीत रजनीपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश या फेस्टिव्हलमध्ये आहे.