दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये टीव्ही9 नेटरवर्कचा इंडिया फेस्टिव्हल सुरू झाला आहे. दुर्गा पूजेच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला हा महोत्सव पाच दिवस चालणार आहे. या महोत्सवात केवळ देशातीलच नव्हेतर विदेशातूनही व्यापारी आले आहेत. देशातीलच नव्हे तर परदेशातील व्यापाऱ्यांचे मिळून एकूण 250 स्टॉल्स या महोत्सवात लावण्यात आले आहेत. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाटी एकापेक्षा एक सुंदर दागिने, पर्स, साडी, सूट या ठिकाणी उपलब्ध आहेत. बुजुर्गांसाठी गुडघ्यांच्या दुखण्यासाठी थायलंडचा बाम, घर सजवण्यासाठी एकापेक्षा एक वस्तू या ठिकाणी मिळणार आहेत. आजपासून सुरू झालेल्या या फेस्टिव्हलचा समारोप 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आज दुपारी 12 वाजता दुर्गा पूजेनंतर हा महोत्सव सुरू झाला असून पहिल्याच दिवशी महोत्सवाला प्रचंड गर्दी झाली आहे.
दुर्गा पूजा आणि दसऱ्यासाठी कुटुंबासह फिरायला जाण्याचा प्लान करणार असाल तर दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियमला जरूर भेट द्या. नवरात्रीच्या निमित्ताने इंडियन फेस्टिव्हलची आज विधिवत सुरुवात झाली आहे. या फेस्टिव्हलमध्ये मुलांच्या आवडीनिवडींवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. त्यातील स्लॉटमध्ये दिल्लीचा मॅजिक इन्स्टॉल आहे. रुमालातून गायब करने, रुमालातून पाणी पडू न देणं, दोरी कापून तिची गाठ गायब करने अशा अनेक गोष्टी या जादूतून दाखवण्यात आल्या आहेत. या स्टॉलवर तुम्ही एका जादूई किटमधून जादू शिकू शकता. आणि या जादूई किटद्वारे मुलांचं मनोरंजनही करू शकता.
आसाममधून आलेल्या साड्यांना महिलांची खास पसंती आहे. हे सर्व हँडलूम प्रोडक्ट आहे. या साड्यांवर कास्तकरी अत्यंत चांगली दाखवण्यात आली आहे. या साड्या फक्त एक हजार रुपयांपासून 18 हजार रुपयांपर्यंतच्या आहेत, असं आसाममधील व्यापारी चेतन यांनी सांगितलं.
कुटुंबासोबत जर तुम्ही कुठे पिकनिकला जाण्याचा प्लान करत असाल तर इंडियन फेस्टिव्हलमध्ये अर्बन मेट्सचा स्टॉलवर लाकडाची चटई आहे. या चटईची एक किट घेऊ शकता. ही चटई अत्यंत हलकी आणि गद्देदार आहे. विशेष म्हणजे एका जागेहून दुसरीकडे घेऊन जाण्यास ती सोपी आहे. फक्त 400 ग्रॅमच्या आसपास या चटईचं वजन आहे. ही चटई तुम्ही सहजपणे कुठेही घेऊन जाऊ शकता, असं अर्बन मेट्सचे विक्रेते टीटी गुलफाम यांनी सांगितलं.
या ठिकाणी एक दुबईचा व्यापारी आला आहे. जुहेद खान असं त्याचं नाव आहे. मी पहिल्यांदाच इंडियन फेस्टिव्हलमध्ये माझा स्टॉल लावत आहे. मला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. आम्ही अत्तराच्या वेगवेगळ्या व्हरायटी या ठिकाणी ठेवल्या आहेत. या अत्तरांची किंमत 500 रुपयांपासून सुरू होते. या ठिकाणी आम्ही फ्रेंच आणि दुबईचे अत्तरही ठेवले आहेत, असं जुहेद खान यांनी सांगितलं. विशेष म्हणजे जुनेद हे बसल्या जागी अत्तर बनवून देत आहेत.
या शिवाय थायलंडचा एक व्यापारी वसीम खान महिला आणि मुलांसाठी खास वस्तू घेऊन आला आहे. वसीमच्या स्टॉलवर अगणित खेळणी आहेत. एकदा या स्टॉलला भेट दिली तर तुमचा पायही निघणार नाही, इतकी व्हरायटी या ठिकाणी मिळत आहे. अफगाणिस्तानचा व्यापारी मायीम सुल्तानी यांनी आणलेलं ड्रायफ्रुट्सही लोकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. गेल्यावर्षीही सुल्तानी यांनी या फेस्टिव्हलमध्ये स्टॉल लावला होता. त्यावेळी त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे त्यांनी या वर्षीही आपला स्टॉल लावला आहे. अंजीर, बादाम, खजूर, काजू, किशमिश आदींची विक्री त्यांनी सुरू केली आहे. त्यांच्याकडील शाही मेमरो अत्यंत खास आहे. त्यात तेलाचं प्रमाण अधिक असल्याने थोडं महागडं आहे.