नवी दिल्ली: TV9 नेटवर्क गेल्यावर्षी डिजीटलमध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. त्यानंतर आता TV9 नेटवर्क OTT प्लॅटफॉर्मवर थैमान घालणार आहे. TV9 नेटवर्क हे देशातील एकमेव मोठं असं नेटवर्क न्यूज आहे. कारण TV9 नेटवर्क हे अनेक भाषांमध्ये प्रसारीत होणार चॅनेल आहे. TV9 नेटवर्क News9 Plus लवकरचं लाँच करण्याच्या तयारी आहे. ते इंग्रजी व्हिडिओ न्यूज मॅगझिन असून ते तुम्हाला ओटीटीवरती पाहायला मिळणार आहे. OTT प्लॅटफॉर्मवर बातम्यांची सेवा सुरू करणारं जगातील पहिलीचं नेटवर्क असेल. OTT वरील News9 Plus हा News9 चा डिजिटल नवा अवतार दिसणार असून News9 Plus फेब्रुवारी महिन्यात कधीही लॉन्च होऊ शकतं. तसेच पुढच्या महिन्यापासून ते पुर्णपणे काम करू शकणार आहे. तसेच नव्या OTT प्लॅटफॉर्मवर तुम्हाला बातम्या, कथा आणि वादविवाद पाहता येणार आहेत.
TV9 नेटवर्कचे सीईओ बरुण दास यांनी नव्या OTT प्लॅटफॉर्मबाबत म्हणतात की, भारतातली पत्रकारितेने स्वत:ला एका धाग्यात गुंतले आहे. तसेच त्यांनी कोणत्याही गोष्टीचा फायदा घेतलेला नाही. वृत्तपत्राला कायम अनुदान मिळत गेलेलं आहे. तसेच टिव्ही चॅनेलांनी अधिकतर मुक्त प्रसार केलं आहे. त्यामुळे आम्ही जाहिरातीला घेऊन अधिक दबावात असतो. तसेच आम्हाला काही ग्राहकांनी डिजीटलसाठी बातम्या देणं सुरू केलं आहे. तसेच ग्राहकांना हव्या असलेल्या पध्दतीने डिजीटल बातम्या देऊ शकतात.
इंग्रजी भाषिक प्रेक्षकांसाठी
मागच्या वर्षांपासून इंग्रजी वाहिन्यांची प्रेक्षकवर्ग अत्यंत कमी झाला आहे. त्यामुळे इंग्रजी भाषिकांचा प्रेक्षक वर्ग आमच्या लक्षात आला आहे. तसेच अनेक वर्षांपासून OTT प्लॅटफॉर्मची वाट पाहत होते. त्यामुळे त्यांच्यासाठी हा OTT प्लॅटफॉर्म आम्ही सुरू करीत आहोत. लीनियर न्यूज टेलिव्हिजन नजीकच्या भविष्यात OTT बातम्या सेवेसाठी मार्ग मोकळा करेल. तसेच हिंदी भाषिक चॅनेलमध्ये टिव्ही चॅनेल अजून अधिक काळ राहील. परंतु UI/UX सह येणार्या इंग्रजीमध्ये अत्याधुनिक OTT बातम्या देण्यासाठी ही नक्कीच सर्वोत्तम वेळ आहे. हे तंत्रज्ञान सखोल, सखोल सामग्री वितरीत करू शकते असं TV9 नेटवर्कचे सीईओ बरुण दास यांचं मत आहे.
जेनफ्लिक्स, नेटफ्लिक्सच्या दर्जाचं
एखादी बातमी सोशल मीडियावरती काही सेंकदात दिसते. त्यामुळे येणा-या काळात आपल्याला चालण्यासाठी ता हा पॅटर्न नवीन बनवावा लागेल. जेनफ्लिक्स, नेटफ्लिक्सच्या बाबतीत जे घडले म्हणजे लोकांनी त्यांना स्विकारले आहे . त्यामध्ये सध्या OTT प्लॅटफॉर्मची गरज आहे. डिजिटल युगात निर्माण झालेली ही उणीव पूर्ण करण्यासाठी बातम्यांच्या दुनियेत News9 Plus लॉन्च होणार आहे. सध्याच्या डिजीटल युगात अनेकांना व्हिडीओ आवडल्याचे आपण पाहतोय, त्यामुळे News9 Plus देखील त्याच फॉरमॅटमध्ये आणला जाईल असंही TV9 नेटवर्कचे सीईओ बरुण दास यांनी सांगितलं.
जगातील पहिलंच ओटीटी चॅनल
आम्ही लॉन्च करीत असलेला OTT प्लॅटफॉर्म केवळ भारतातच नाही तर शक्यतो जगातील पहिला असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्हाला अशी खात्री आहे की, जे वृत्तसेवा OTT प्लॅटफॉर्मवर पुर्णपणे येईल तेव्हा ती जुन्या चुका पुन्हा पुन्हा करणार नाही. मला खात्री आहे की हे नवीन मॉडेल SVOD (सबस्क्रिप्शन आधारित व्हिडिओ ऑन डिमांड) मॉडेल आणि जाहिरात कमाईवर आधारित असेल. तसे झाल्यास अनेकांना त्याचा फायदा होईल. पण त्यामुळे व्यवसाय व्यवहारीक होऊ देऊ नका.
लाईव्ह न्यूज कॉमेंट्रीपेक्षा वेगळं चॅनल
News9 Plus चॅनेलकडून प्रेक्षकांवर सोपवण्यात आलेली अव्यवस्था संपूर्णपणे बदलून टाकण्यात येईल. 24 तास लाईव्ह न्यूज कॉमेंट्रीपेक्षा हे चॅनल वेगळं असेल. त्यावर काळानुसार स्पेशल व्हिडीओही टाकण्यात येणार आहे. लोकांची आवड आणि मार्केटची मागणी यानुसार हे स्पेशल व्हिडीओ दिले जाणार आहेत. सर्वात आधी News9 Plus अनेक प्रकारच्या रेल ट्रॅक्सचं आयोजन करेल. त्यामुळे अॅपवर दिवसभर बातम्या प्रसारीत होतील. संपादकीय दृष्ट्या समृद्ध आणि दीर्घ शेल्फ लाईफवाला कंटेट दिसेल.
ओटीटीच्या प्रेक्षकांना चांगला कंटेंट देणार
”News9 Plus टीवी9च्या नेटवर्कचे भविष्य पूर्ण करण्यासाठीच आहे. इंग्रजी प्रेक्षक कुठे जात आहेत आणि का जात आहेत हे आम्ही जाणून आहोता. जेनेफ्लिक्सचे प्रेक्षक बातम्यांपासून दुरावलेला नाही. टेलिव्हिजनवर सुरू असलेल्या गोंधळापासून तो दूर जात आहे. सध्या एकमेकांवर हल्ला करणारी पत्रकारीता सुरू आहे. ओटीटीच्या प्रेक्षकांना ही पत्रकारिता नको आहे. त्यांना यापेक्षा काही वेगळं हवं आहे. ‘जेनफ्लिक्स’च्या प्रेक्षकांना ‘you bite me, I bite you’ प्रकारच्या पत्रकारितेचा कंटेट नको आहे. त्यामुळेच भविष्यातील बातम्यांची लढाई ओटीटीवर लढावी लागणार आहे. आमच्यासाठी आता हेच भविष्य आहे. आणि आपण त्याला न्यूज़9 प्लस म्हणू शकतो, असं टीव्ही9 नेटवर्कचे ग्रुप एडिटर बी. व्ही. राव यांनी सांगितलं.
वास्तव आणि तथ्यात्मक कंटेट देण्याची जबाबदारी
सब्सक्राईबर्सला News9 Plusवर ओटीटी प्लॅटफॉर्मवर अप्रतिम सीरिज, सीजन आणि एपिसोड मिळतील. अशावेळी विश्वासहार्य, वास्तव आणि तथ्यात्मक कंटेट देण्याची जबाबदारी ही संपादकीय बारकावे आणि पत्रकारितेची कसोटी असेल. त्यामुळे हा कंटेट विश्वासहार्य आणि आकर्षक पद्धतीने द्यावा लागणार आहे. प्रत्येक प्रेक्षकांसाठी News9 Plus हा चांगला अनुभव असेल यासाठी आमचे प्रयत्न असतील.