नवी दिल्ली : एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) खरेदी केल्यापासून वाद काही त्यांचा पिच्छा सोडत नसल्याचे चित्र आहे. मस्क यांच्या भूमिकेवरुन ट्विटर आणि ट्विटर बाहेरील जगतात वादंग उठले आहे. त्यांच्या भूमिकेविरोधात जगभरातून टीका होत असताना आता कर्मचाऱ्यांसाठी (Employees) मस्क यांना पुन्हा गुगली टाकली आहे. शुक्रवारी ट्विटरने भारतातील तीन पैकी दोन ऑफिस बंद केले आहेत. हे दोन ऑफिस मुंबई व दिल्लीतील आहेत. जेव्हा कर्मचारी कार्यालयात पोहचले, तेव्हा त्यांना घरी पाठवण्यात आले. सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार, ट्विटरचे भारतात आता केवळ तीनच कर्मचारी आहेत.
मस्क आणि वाद
ऍलन मस्कनं 44 मिलियन डॉलरमध्ये ट्विटर विकत घेतले. तेव्हापासून धडाकेबाज निर्णय घेतले. ट्विटरमध्ये साडेसात हजार कर्मचारी आहेत. त्यापैकी अर्ध्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवले. नोव्हेंबर महिन्यापर्यंत ट्विटरचे भारतात २०० कर्मचारी होते. त्यात कपात करण्यात आलीय. आता केवळ तीन कर्मचारी उरले आहेत. या तीन कर्मचाऱ्यांपैकी एक जण कन्ट्री टीम लीडर आहे. अन्य दोघांमध्ये नॉर्थ आणि ईस्ट तर दुसऱ्याकडे साऊथ झोन दिले आहे. हे सर्व कर्मचारी वर्क फ्रॉम होम करणार आहे.
ट्विटरचे बेंगळुरु कार्यालय सुरु आहे. त्यातील कर्मचारी सरळ अमेरिकेतील कार्यालयात रिपोर्ट करतात. त्यांचा भारतातील कार्यालयांशी संबंध येत नाही. त्यामुळे एका अर्थाने ट्विटरने भारतात केवळ तीन कर्मचारी ठेवले आहे.
ब्लू टिकसाठी पैसे
युझर्सला ट्विटरच्या (Twitter) ब्ल्यू टिकसाठी पैसे मोजावे लागत आहे. यासंदर्भातील निर्णय मस्क यांनी यापुर्वीच जाहीर केला. सर्वच वापरकर्त्यांना ब्लू टिकसाठी रक्कम मोजावी लागेल. भारतात Twitter Blue सेवेसाठी युझर्सला 650 रुपये प्रति महिना जमा करावा लागेल. तर वेबवर ट्विटरचा वापर करणाऱ्यांना 650 रुपये दरमहा, तर मोबाईल युझर्सला मात्र जादा रक्कम मोजावी लागेल. त्यांना 900 रुपये प्रति महिना शुल्क मोजावे लागेल.
अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्युझीलँड आणि जपान या देशांसह इतर देशात ट्विटर ब्लू सशुल्क सेवा सुरु केली होती. या देशामध्ये ब्लू टिकच्या नोंदणीसाठी 8 डॉलर प्रति महा शुल्क निश्चित करण्यात आले होते.
वार्षिक नोंदणी शुल्काचीही घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, वापरकर्त्यांना ब्लू टिकसाठी वार्षिक 84 डॉलर जमा करणे आवश्यक आहे. ट्विटरच्या म्हणण्यानुसार, 3 डॉलर जादा चार्ज लावून ही रक्कम ते गुगलला कमिशन म्हणून देणार आहेत. भारतात 6800 रुपये वार्षिक शुल्क असेल.