Twitter Down : जगभरात ट्विटर डाऊन, तांत्रिक कारणांमुळे युजर्स त्रस्त

| Updated on: Apr 17, 2021 | 7:03 PM

जगभरात ट्विटर डाऊन, तांत्रिक कारणांमुळे युजर्स त्रस्त (Twitter services down)

Twitter Down : जगभरात ट्विटर डाऊन, तांत्रिक कारणांमुळे युजर्स त्रस्त
ट्विटर
Follow us on

मुंबई : मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरला तांत्रिक व्यत्यय आला होता. त्यामुळे युजर्सना ट्विट करणे किंवा लॉग इन करता येत नव्हतं.  आज दिवसभरात ट्विटरवर तांत्रिक व्यत्यय येत होता. मात्र संध्याकाळच्या सुमारास ही सेवाच ठप्प झाल्याचं दिसत होतं. त्यानंतर आता काही वेळानंतर ट्विटर पुन्हा सुरळीत झाले आहे. तशा प्रतिक्रिया वापरकर्त्यांनी दिल्या आहेत.  (Twitter services down globally Twitter outage in India too)

ट्विटरवर नेमकी अडचण काय ?

ट्विटर रिफ्रेश केल्यानंतर आपोआप लॉग इन पेजवर जात होते. त्यानंतर स्क्रीन सतत ब्लिंक होत असल्याचं वापरकर्त्यांना दिसून आलं. हा तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला हे शोधण्यासाठी लोक गुगल सर्च करत होते. मात्र काही वेळाने ट्विटर पुन्हा सुरळीत झाले. या प्रकारानंतर कंपनीने अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाही. ट्विटरही मायक्रो ब्लॉगिंगमध्ये सर्वात लोकप्रिय साईट आहे. ट्विटरचे युजर्स कोटींनी आहेत. मात्र,  ट्विटरला लॉगिनसाठी अडचणी आल्यामुळे अनेकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे काही क्षणात ट्विटर डाऊन (#TwitterDown) हा हॅशटॅग ट्रेंडिगवर आला होता.

याआधीसुद्धा ट्विटर बंद 

याआधीसुद्धा 29 मार्च सकाळी साधारण 10.30 पासून ट्विटर वापरण्यास अचानकपणे अडचणी येत होत्या. त्यानंतर काही क्षणांत जगभरातून #twitter down हा हॅशटॅग ट्रेंडींगला आला होता. अनेकांनी ट्विट, रिट्विट तसेच मिडीया अ‌ॅक्सेस करण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याची तक्रार केली होती. अमेरिका, ब्रिटनसारख्या मोठ्या देशांमध्या ही अडचण पाहायला मिळाली होती. त्यानंतर तब्बल एका तासानंतर ट्विटर पुन्हा सुरळीत झाले होते. एका रिपोर्टनुसार 16000 पेक्षा जास्त युजर्स या अडचणीने प्रभावित झाले होते. त्यानंतर आज पुन्हा जागतिक स्तरावर ट्विटर वापरकर्त्यांना पुन्हा अडचणी येत आहेत.

इतर बातम्या :

लाँचिंगपूर्वीच Realme 8 5G चे फीचर्स लीक, या स्मार्टफोनमध्ये काय असेल खास?

Snapdragon 888, 48MP कॅमेरा, 4000mAh बॅटरी, शानदार स्मार्टफोन Amazon वर लाँच होणार

जिओचे 150 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंतचे धमाकेदार प्लॅन, विनामूल्य कॉलिंगसह बंपर डेटा

(Twitter services down globally Twitter outage in India too)