उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यात 20 मिनिटे चर्चा, विरोधी पक्षांच्या गोटात मोठ्या घडामोडी

| Updated on: Jul 17, 2023 | 11:08 PM

कर्नाटकच्या राजधानीतील बंगळुरु येथे मोठ्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्षांची एकजूट कशी झाली पाहिजे, कसं लोकसभा निवडणुकांना सामोरं गेलं पाहिजे, या दृष्टीने विरोधी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यात 20 मिनिटे चर्चा, विरोधी पक्षांच्या गोटात मोठ्या घडामोडी
फाईल फोटो
Follow us on

बंगळुरु | 17 जुलै 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात आगामी लोकसभा निवडणुकीत एकत्रितपणे सामना करण्यासाठी विरोधी पक्षांच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहेत. भाजपची सत्ता घालवण्यासाठी देशभरातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेसकडून उद्या विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरुत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील बंगळुरुत पोहोचले आहेत. विरोधी पक्षांच्या बैठकीआधी आज रात्री काँग्रेसकडून बंगळुरुतील एका हॉटेलमध्ये डिनर डिप्लोमसीचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षांची आज रात्रीदेखील बैठक पार पडली आहे. त्यानंतर आता उद्या महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी सर्व विरोधत बंगळुरुत दाखल होत आहेत. विशेष म्हणजे उद्याच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील बंगळुरुत आज दाखल झाले. उद्धव ठाकरे विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी बंगळुरु विमानतळावर दाखल झाले तेव्हा त्यांचं स्वागत करण्यात आलं. तसेच बंगळुरुत दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचं काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात 20 मिनिटं चर्चा देखील झाली.

महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज या दोन्ही नेत्यांची भेट झालीय. दरम्यान, सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांचा बंगळुरुच्या वेस्ट एंड हॉटेलमध्ये मुक्काम आहे. हॉटेलमध्ये विरोधकांची आज रात्री बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर विरोधकांचं स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं. त्यानंतर उद्या पुन्हा विरोधकांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

हे सुद्धा वाचा

उद्याच्या बैठकीत नेमकं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार?

उद्याच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये प्रचाराचं सूत्र काय असलं पाहिजे, जागा वाटपाचा प्रत्येक राज्यातला फॉर्म्युला काय असला पाहिजे, किमान समान कार्यक्रम यासाठी उपसमितीची निवड होणार आहे. तसेच विरोधी पक्षांच्या बैठकीला नाव दिलं जाणार आहे. असे अनेक मुद्दे चर्चेला येणार असल्याने उद्याच्या बैठकीचा दिवस महत्त्वाचा आहे.

उद्याच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. ते आज डिनर डिप्लोमसीला अनुपस्थित आहेत. त्यामुळे याबाबत सकाळपासून चर्चा सुरु आहेत. पण ते उद्या बैठकीला हजर राहतील, अशी माहिती समोर येत आहे.