UGC NET 2024 Postponed : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) 15 जानेवारी 2025 रोजी होणारी UGC NET डिसेंबर 2024 ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. NTA च्या माहितीनुसार, मकर संक्रांत आणि पोंगल सारखे सण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. 15 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा वगळता इतर सर्व तारखांच्या परीक्षा त्यांच्या वेळापत्रकानुसारच होतील.
सणासुदीमुळे परीक्षा पुढे ढकलल्या
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) अधिकृत वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, पोंगल, मकर संक्रांत आणि या तारखेला येणारे इतर सण लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, 16 जानेवारी 2025 रोजी होणारी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच घेण्यात येणार आहे.
परीक्षा कधी होणार?
एनटीएने अधिकृत वेबसाइटद्वारे ही माहिती जारी केली आहे, ज्यात म्हटले आहे की 15 जानेवारी रोजी होणारी डिसेंबर सत्रासाठी UGC NET परीक्षा एनटीएने पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या नव्या तारखेची माहिती नंतर अधिकृत संकेतस्थळावर ugcnet.nta.ac.in होईल. त्यावर देण्यात येणार आहे.
UGC NET म्हणजे काय?
UGC NET नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट किंवा ‘ UGC NET ‘ ही भारतातील एक राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा आहे. ज्याअंतर्गत महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची नियुक्ती करता येईल. पदवीधर उमेदवारांसाठी विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी ही पदे आवश्यक आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून अर्धवार्षिक आयोजन केले जाते. सन 2009 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक होण्यासाठी या परीक्षेची पात्रता बंधनकारक केली.
परीक्षा केंद्रावर काय घेऊन जायचे?
उमेदवारांना परीक्षा केंद्रावर घेऊन जाण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रवेशपत्र. त्याशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्राच्या आत जाता येणार नाही. याशिवाय उमेदवारांना वैध फोटो आयडी प्रूफही सोबत ठेवावा लागणार आहे, कारण त्याशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही. उमेदवार आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स सारखी कागदपत्रे सोबत बाळगू शकतात.
PhD करायची?
PhD प्रवेश गुणवत्ता यादी कशी तयार होते? याचं प्रश्नाचं उत्तर पुढे वाचा. नेट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या नेट पर्सेंटाइलला 70 टक्के, तर मुलाखतीला 30 टक्के वेटेज देण्यात येणार आहे. कॅटेगरी 2 आणि कॅटेगरी 3 या दोन्ही कॅटेगरीतील नेट स्कोअर केवळ एका वर्षासाठी वैध असेल.