मुस्लीम धर्मगुरुंच्या संमतीने महाकाल मंदिराजवळील मशिदीवर बुलडोझर, 257 घरे जमीनदोस्त

| Updated on: Jan 11, 2025 | 9:12 PM

Mahakal temple corridor project: शनिवारी अतिक्रमण काढण्याची कारवाई होणार असल्यामुळे शुक्रवारी मोठ्या संख्येने पोलीस दल घटनास्थळी तैनात करण्यात आले होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितेश भार्गव आणि एसडीएम लक्ष्मी नारायण गर्ग यांनी घरे रिकामी करण्याचे अपील केले होते.

मुस्लीम धर्मगुरुंच्या संमतीने महाकाल मंदिराजवळील मशिदीवर बुलडोझर, 257 घरे जमीनदोस्त
उज्जैन येथील मशिदीवर कारवाई
Follow us on

Mahakal temple corridor project: महाकालची नगर असलेल्या उज्जैन शहरात धार्मिक एकतेचे अनोखे दर्शन दिसून आले. महाकाल मंदिर परिसरात असलेले अतिक्रमण काढण्यात आले. मंदिर परिसरात असलेल्या तकिया मशिदीवर बुलडोझर चालवण्यात आले. त्यासाठी मुस्लीम समाजाने समंती दिली होती. प्रशासनाने मुस्लीम धर्मगुरुंशी यासाठी अनेक वेळा चर्चा केली होती. त्यांची संमती मिळाल्यानंतर बुलडोझर चालवण्यात आले. तसेच या भागातील बेगमबाग आणि निझामुद्दीन कॉलनीत असलेली 257 घरेही जमीनदोस्त करुन हा परिसर महाकाल भक्तांसाठी मोकळा केला.

न्यायालयाचा निर्णयानंतर कारवाई

महाकाल मंदिर क्षेत्राचे विस्तारीकरण आणि सौंदर्यीकरणास बेगमबाग आणि निझामुद्दीन कॉलनीतील घरे अडथळे ठरत होती. या ठिकाणी अतिक्रमण काढण्याचे प्रकरण अनेक वर्ष न्यायालयात सुरु होते. उच्च न्यायालयाने त्यास मंजुरी दिल्यावर शनिवारी अतिक्रमण काढण्यात आले. अतिक्रमण काढण्याच्या कारवाईच्या प्रसंगी मोठ्या संख्येने पोलीस दल घटनास्थळी ठेवण्यात आले होते.

मुस्लीम धर्मगुरुंसोबत अनेक फेऱ्यांमध्ये चर्चा

अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितेश भार्गव यांनी सांगितले की, मशीद हटवण्यासाठी धर्मगुरुंसोबत चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी मशीदचे सामान काढण्यासाठी वेग मागितला. प्रशासनाने त्यांना तो वेळ दिला. धर्मगुरुंच्या संमतीनंतर मशीद पाडण्याची कारवाई झाली.

हे सुद्धा वाचा

सव्वा दोन हेक्टर परिसर रिकामा

शनिवारी अतिक्रमण काढण्याची कारवाई होणार असल्यामुळे शुक्रवारी मोठ्या संख्येने पोलीस दल घटनास्थळी तैनात करण्यात आले होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितेश भार्गव आणि एसडीएम लक्ष्मी नारायण गर्ग यांनी घरे रिकामी करण्याचे अपील केले होते. दुसरीकडे अनेक लोकांनी स्वइच्छेने घरी रिकामी करुन दिली. महाकाल मंदिर विस्तार योजनेतंर्गत हे काम करण्यात आले. सुमारे सव्वा दोन हेक्टर परिसर मोकळा करण्यात आला.

2028 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ मेळाव्यासाठी उज्जैनमध्ये काम सुरु आहेत. त्यासाठी मंदिर परिसराचा विस्तार आणि वाहन पार्किंगचा प्रस्ताव आहे. आता या ठिकाणचे अतिक्रमण काढल्यानंतर या ठिकाणी भाविकांसाठी सोयी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. या ठिकाणी पार्किंगसह इतर सुविधा केल्या जातील.