स्मशानभूमीतच काळाचा घाला; बुजुर्गाच्या अंत्यसंस्कारावेळी छत कोसळून 15 जणांचा मृत्यू

| Updated on: Jan 03, 2021 | 5:37 PM

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. (Under construction ceiling collapsed in Muradnagar, uttar pradesh)

स्मशानभूमीतच काळाचा घाला; बुजुर्गाच्या अंत्यसंस्कारावेळी छत कोसळून 15 जणांचा मृत्यू
Follow us on

गाझियाबाद: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. एका बुजुर्ग व्यक्तीवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असतानाच स्मशानभूमीचं सिमेंटचं छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अजूनही 10 ते 12 जण दबले असून त्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गंभीर दखल घेतली असून प्रशासनाला या दुर्घटनेचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदतही जाहीर केली आहे. (Under construction ceiling collapsed in Muradnagar, uttar pradesh)

गाझियाबादच्या मुरादनगर परिसरात ही दुर्देवी घटना घडली. राम धन नावाच्या एका आजोबांचा मृत्यू झाल्याने त्यांचे पार्थिव मुरादनगर येथील उखरानी/ बम्बा रोडवरील स्मशानभूमीत आणण्यात आले होते. यावेळी अंत्यसंस्काराला राम धन यांच्या नातेवाईकांसह एकूण 25 जण उपस्थित होते. सकाळपासूनच या परिसरात वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरू आहे. त्यामुळे लोक स्मशानभूमीत दाटीवाटीने जमा झाले होते. त्यावेळी अचानक स्मशानभूमीचं निर्माणाधीन सिमेंटचं छत कोसळलं. त्यामुळे अनेक लोक या ढिगाऱ्याखाली दबल्या गेले.

ही घटना घडल्याने संपूर्ण स्मशानभूमीत एकच आक्रोश सुरू झाला. लोकांनी आरडाओरड सुरू केली. ढिगाऱ्याखाली दबलेल्यांनी एकच ओरडा सुरू केला. त्यामुळे स्थानिकांनी तात्काळ पोलीस आणि एनडीआरएफच्या तुकडीला घटनास्थळी पाचारण केलं. एनडीआरएफच्या टीमने घटनास्थळी धाव घेऊन ढिगारा उपसण्याचं काम सुरू केलं असून ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 15 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. क्रेनच्या सहाय्याने ढिगारा उपसण्याचं काम अजूनही सुरू असून ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. तसेच या घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. (Under construction ceiling collapsed in Muradnagar, uttar pradesh)

 

संबंधित बातम्या:

छत्तीसगड, महाराष्ट्रातून 100 नक्षलवाद्यांची मध्य प्रदेशात घुसखोरी; अर्धसैनिक दल घेणार झाडाझडती

आता रेल्वेचं तिकिट बुक करणं आणखी सोपं, IRCTC कडून नवं फिचर लाँच

रविवार विशेष : नव्या वर्षात 32 हजार नव्या नोकऱ्यांची नांदी; 10 वी पासपासून PG पर्यंत शिकलेल्यांना सुवर्णसंधी

(Under construction ceiling collapsed in Muradnagar, uttar pradesh)