नवी दिल्ली : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनने कोरोनावर मात केलीय. छोटा राजन याची प्रकृती आता चांगली असून त्याला AIIMS मधून डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यानंतर त्याची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली आहे. छोटा राजन याला तिहार जेल नंबर 2 मध्ये कडेकोट सुरक्ष्या व्यवस्थेत ठेवण्यात आलंय. 22 एप्रिल रोजी छोटा राजनची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. प्रकृती बिघडल्यामुळे 25 एप्रिल रोजी त्याला दिल्लीतील AIIMS रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. (Underworld don Chhota Rajan’s corona test negative)
दरम्यान, चार दिवसांपूर्वी छोटा राजन याच्या मृत्यूची बातमी समोर आली होती. पण ती खोटी असल्याचं काही वेळातच समोर आलं. छोटा राजन याचा कोरोनामुळे मृत्यू झाला ही बातमी खोटी असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत, असं स्पष्टीकरण AIIMS कडून त्यावेळी देण्यात आलं होतं. तब्बल 26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकणी गँगस्टर छोटा राजनसह तिघा जणांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जानेवारी महिन्यात ही शिक्षा सुनावली होती.
छोटा राजन ऊर्फ नाना, याचं खरं नाव राजन सदाशिव निकाळजे असं आहे. तो सुरुवातीला अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई बॉम्ब हल्ल्याचा आरोपी दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार होता. मात्र, कालांतराने दोघांमध्ये टोकाचं शत्रूत्व निर्माण झालं.
छोटा राजनने मुंबईतील एका चित्रपटगृहाबाहेर ब्लॅक तिकीट विकण्याचं काम सुरु केलं. त्यानंतर त्याची भेट राजन नायर ऊर्फ बडा राजन याच्याशी भेट झाली. बडा राजनकडून त्याने चुकीच्या आणि गुन्हेगारीच्या अनेक गोष्टी शिकल्या. येथूनच त्याच्या गुन्हेगारी विश्वातील कट-कारस्थानाला सुरुवात झाली. तो दारुची तस्करी करु लागला. बडा राजनच्या मृत्यूनंतर गुन्हेगारी विश्वात तो छोटा राजन म्हणून नावरुपाला आला. त्याच्यावर खंडनी, हत्येची, तस्करीचे अनेक मोठमोठे आरोप आहेत. सध्या तो जेलमध्ये शिक्षा भोगतोय.
छोटा राजन विरोधात 17 हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हेल दाखल आहेत. तो कित्येक वर्षांपासून फरार होता. मात्र, 2015 साली त्याला इंडोनेशियातून अटक करण्यात आली.
गोवा मेडिकल कॉलेजमध्ये अवघ्या 4 तासांत 26 रुग्णांचा मृत्यू! उच्च न्यायालयामार्फत चौकशीची मागणी https://t.co/WCxSpToMWG @DrPramodPSawant @BJP4Goa @PMOIndia @narendramodi #Goa #GoaHospital #CoronaPatientDied #OxygenShortage #PramodSawant
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 11, 2021
संबंधित बातम्या :
Chhota Rajan | अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला तिहार तुरुंगात कोरोना, ‘एम्स’मध्ये दाखल
26 कोटींची खंडणी मागितली; गँगस्टर छोटा राजनला दोन वर्षाची शिक्षा
Underworld don Chhota Rajan’s corona test negative