LIVE Budget 2024 Speech Highlights: केंद्रीय अर्थसंकल्पावरुन खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

| Updated on: Jul 26, 2024 | 2:04 PM

Nirmala Sitharaman Union Budget Live Speech highlights and Updates in Marathi : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे.

LIVE Budget 2024 Speech Highlights: केंद्रीय अर्थसंकल्पावरुन खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
Follow us on

Union Budget 2024 Live Update : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे. तर अर्थमंत्री सीतारामन या सलग सातवा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात महिला, तरुण, शेतकरी आणि गरीबांवर लक्ष केंद्रीत केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासोबतच आजच्या अर्थसंकल्पातून आयकरदात्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही अर्थसंकल्पात मोठी तरतूद असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, भांडवली नफा कराबाबत सरकार काही घोषणा करण्याची शक्यता आहे. देशाचा अर्थसंकल्प आज सादर होत असल्याने शेअर बाजारात प्रचंड चढ उतार होण्याची शक्यता आहे.

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Jul 2024 07:54 PM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये ‘हिट अँड रन’चा आणखी एक प्रकार उघड

    पिंपरी चिंचवडमध्ये ‘हिट अँड रन’चा आणखी एक प्रकार उघड झाला आहे. काल रात्री दहा वाजताच्या सुमारास निगडी प्राधिकरण पेठ क्रमांक 27 मधील आयसीआयसीआय बँक ते पोस्ट ऑफिस या दरम्यानच्या रस्त्यावर भरधाव वेगात आलेल्या कारने अकरावीतील दोन मुलांना धडक दिली. अपघातानंतर कारचालक पळून गेला. जखमी विद्यार्थ्यांना निगडीतील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

  • 23 Jul 2024 07:50 PM (IST)

    जरांगे पाटील यांची तब्येत खालावली, डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी सुरु

    मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा चौथा दिवस आहे. त्यांची तब्येत अत्यंत खालावली आहे. त्यामुळे शासनाचे वैद्यकीय पथक तसेच छत्रपती संभाजीनगर गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर चावरे हे उपोषण स्थळी आले आहेत. ते जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी करत आहेत.


  • 23 Jul 2024 07:35 PM (IST)

    हा राज्याचा अर्थसंकल्प नव्हता, शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांचा टोला

    महाराष्ट्राला या बजेटमध्ये खूप मोठी काम मिळाली आहेत. हा राज्याचा अर्थसंकल्प नव्हता. बजेटचे भाषण विरोधी पक्षाने ऐकले आहे. त्यातल्या फॅक्ट आणि फिगर पाहिल्या नाहीत. सिंचन, ग्रामीण रस्ते, इकॉनॉमिक कॉरिडॉर, कृषी प्रकल्प, मुंबई मेट्रो यासाठी बजेटमध्ये निधी दिला आहे. करोडो रुपयांच्या तरतुदी राज्यासाठी केल्या आहेत. काँग्रेसने आरोप केला की त्यांच्या गोष्टी या बजेटमध्ये आहेत याचा अर्थ बजेट चांगला आहे असा टोला शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी लगावला.

  • 23 Jul 2024 07:20 PM (IST)

    ठाण्यात बनावट दस्तावेज सादर करून महिलेने पाकिस्तानचा व्हिसा मिळविला

    ठाण्यात राहणाऱ्या एका महिलेने पासपोर्ट कार्यालय आणि पोलीस ठाण्यात बनावट दस्तावेज सादर करून पाकिस्तानचा व्हिसा मिळविला. या व्हिसाच्या आधारे ती पाकिस्तानमध्ये जाऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वर्तक नगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगमा नूर मकसूद अली उर्फ सनम खान असे या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे. तर तिच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

  • 23 Jul 2024 07:03 PM (IST)

    मोदी सरकारचे धोरण महाराष्ट्र विरोधी, नाना पटोले यांची टीका

    देशाचे इतके वाईट बजेट पहिल्यांदा पाहत आहोत. अर्थ संकल्पाने शेतकऱ्यांना काहीही दिले नाही. शेअर्स झपाट्याने पडले आहेत. महाराष्ट्र सगळ्यात जास्त महसूल देतो. तरी आम्हाला काहीच मिळाले नाही. मोदी सरकारचे धोरण महाराष्ट्र विरोधी आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

  • 23 Jul 2024 06:52 PM (IST)

    केंद्राने सादर केलेला अर्थसंकल्प स्वागतार्ह – नितीशकुमार

    नरेंद्र मोदी सरकारने आपला 11वा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पावर बोलताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प सकारात्मक आणि स्वागतार्ह आहे. या अर्थसंकल्पात बिहारच्या गरजांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. या अंतर्गत बिहारच्या मानव संसाधन विकास आणि मूलभूत विकासावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. या अर्थसंकल्पात बिहारमधील रस्ते जोडणी प्रकल्प, ऊर्जा प्रकल्प, विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालये आणि क्रीडा संरचनेसाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे.

  • 23 Jul 2024 06:37 PM (IST)

    नीट परीक्षेत हेराफेरीचा कोणताही पुरावा नाही: सुप्रीम कोर्ट

    नीटवरील आपल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की रेकॉर्डवर पुराव्यांचा अभाव आहे. परीक्षेत त्रुटीचे पुरेसे पुरावे सापडले नाहीत. हजारीबाग आणि पाटण्यात पेपर फुटला. पण परीक्षेत हेराफेरीचा पुरावा नाही.

  • 23 Jul 2024 06:25 PM (IST)

    13 लाख विद्यार्थ्यांच्या क्रमवारीत फेरबदल होणार: सुप्रीम कोर्ट

    सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की NEET परीक्षा पुन्हा होणार नाही, परंतु 13 लाख विद्यार्थ्यांना क्रमवारीत फेरबदलाला सामोरे जावे लागेल. कारण IIT-D ने Atomic Theory प्रश्नासाठी एनटीएने मंजूर केलेल्या दोन पर्यायांपैकी एक पर्याय दिला आहे.

  • 23 Jul 2024 06:10 PM (IST)

    अर्थसंकल्प अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या मोहिमेतील महत्त्वाचा दुवा : अश्विनी वैष्णव

    केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 बद्दल केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात भारताला एक मजबूत अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेतील आजचा अर्थसंकल्प हा महत्त्वाचा दुवा आहे. धोरणांचे तेच प्रतिबिंब आणि योगदान आजच्या अर्थसंकल्पात दिसत आहे. विशेष संधी निर्माण करण्यासाठी सरकारने 2 लाख कोटी रुपयांची विशेष तरतूद केली आहे.

  • 23 Jul 2024 05:44 PM (IST)

    राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी 29 जुलैला होणार

    आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावनी नाहीचं. त्यामुळे आता राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी 29 जुलैला होणार आहे. तर शिवसेना अपात्र प्रकरण सुनावणी 30 जुलैला होईल. आज दोन्ही प्रकरणी वकिलांकडून प्रकरण मेन्शन करण्यात आले.

  • 23 Jul 2024 05:31 PM (IST)

    मुख्यमंत्री 26 जुलैला दिल्ली दौऱ्यावर, कारण काय?

    मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 26 जुलै रोजी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. निती आयोगाची येत्या 27 जुलैला राष्ट्रपती भवनात बैठक होणार आहे.या बैठकीत देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांची उपस्थित असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक भवनात बैठक होणार आहे. त्यानंतर अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे यांची वेगळी बैठक होण्याची शक्यता आहे.

  • 23 Jul 2024 05:27 PM (IST)

    “पण महाराष्ट्रावर अन्याय का?” खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रश्न

    सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावरुन प्रतिक्रिया दिली आहे. “बजेट मधे 2-4 चांगल्या गोष्टी आहेत, पण त्या गोष्टी काँग्रेस-INDIA आघाडीच्या घोषणा पत्रातील.अनेक गोष्टी त्यातील बजेटमध्ये आहेत, लाडकी बिहार, लाडकी आंध्र प्रदेश असं दिसतंय, मग परका महाराष्ट्र का? असा सवालही सुळे यांनी उपस्थित केला.

  • 23 Jul 2024 05:00 PM (IST)

    नवीमुंबई : टोमॅटोने शंभरी गाठली

    टोमॅटोचे दर आकाशाला भिडले आहेत. गेल्या आठवड्यात   70 ते 80 रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो दर आता थेट शंभरी पार झाला आहे.

  • 23 Jul 2024 04:25 PM (IST)

    लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची जनआक्रोश यात्रा नगरच्या शेवगावात दाखल

    लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे दाखल झाली असून कार्यकर्त्यांनी यात्रेचे स्वागत केले आहे.

  • 23 Jul 2024 03:57 PM (IST)

    बजेटमध्ये विकासाचा अजेंडा- योगी आदित्यनाथ

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आजच्या बजेटवर प्रतिक्रिया दिली आहे. या बजेटमध्ये विकासाचा अजेंडा राबवण्यात आला. हा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताचा दस्तावेज आहे, असं ते म्हणालेत.57

  • 23 Jul 2024 03:45 PM (IST)

    देशाच्या प्रगतीचं नाही, तर ‘मोदी सरकार बचाव बजेट’ – मल्लिकार्जुन खरगे

    काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आजच्या बजेटवर टीका केली आहे. मोदी सरकारचा ‘कॉपीकॅट बजेट’मांडलं आहे. काँग्रेसच्या न्याय अजेंड्याची योग्य प्रकारे कॉपी देखील हे लोक करू शकले नाहीत, असं मल्लिकार्जुन खरगे म्हणालेत.

  • 23 Jul 2024 03:30 PM (IST)

    अर्थसंकल्पावर अमोल कोल्हेंचं टीकास्त्र

    आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून टीका करण्यात येत आहे. खासदार अमोल कोलहेंनी ट्वीट करत टीका केली आहे. दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र… सरकार वाचवेन म्हणे नमो!! केंद्र सरकारने आज मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ सरकार वाचवण्याची केविलवाणी धडपड.. आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प…. ट्रिपल इंजिन चे महायुती सरकार निधी वळवण्यात सपशेल फेल.. सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्राच्या पदरी पुन्हा उपेक्षा!, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

  • 23 Jul 2024 03:15 PM (IST)

    अर्थसंकल्पावर शरद पवार गटाची टीका

    केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला गेला. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने टीका केली आहे. अर्थसंकल्पाचा नवा अविष्कार, केंद्राचा महाराष्ट्रावर बहिष्कार!, असं ट्विट शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे.

  • 23 Jul 2024 02:52 PM (IST)

    रोहित पवार यांनी केले मोठे भाष्य

    देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही अर्थसंकल्प नक्कीच मन लावून बारीक ऐकून note down केला असला तरी दुर्दैवाने या बजेटमध्ये महाराष्ट्राला काही नसल्याने तुमची देखील निराशाच झाली असेल, असे रोहित पवार यांनी म्हटले.

  • 23 Jul 2024 02:23 PM (IST)

    सामाजिक क्षेत्रात सरकारकडून मोठी गुंतवणूक

    सामाजिक क्षेत्रात सरकारकडून मोठी गुंतवणूक करण्यात आली- देवेंद्र फडणवीस

  • 23 Jul 2024 02:13 PM (IST)

    अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार- नरेंद्र मोदी

    अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार आहे, असे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

  • 23 Jul 2024 02:07 PM (IST)

    सर्व देशाला न्याय देणारा अर्थसंकल्प- अर्थसंकल्प

    सर्व देशाला न्याय देणारा अर्थसंकल्प, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

  • 23 Jul 2024 01:54 PM (IST)

    Union Budget 2024 Live Update : भाजपने तोंडाला पाने पुसली- जयंत पाटील

    महाराष्ट्राला अर्थसंकल्पाकडून अपेक्षा होत्या. परंतु भाजपने तोंडाला पाने पुसली. कोणत्याही ठिकाणी महाराष्ट्राचा उल्लेख नाही. आंध्रप्रदेश आणि बिहारसाठी खैरात वाटण्यात आली, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

  • 23 Jul 2024 01:45 PM (IST)

    Union Budget 2024 Live Update : पूर्वेकडील राज्यात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या शाखा

    पूर्वेकडील राज्यात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या 100 हून अधिक शाखा उघडणार

    ग्रामीण विकासासाठी 2.66 लाख कोटींची तरतूद

    आंध्रप्रदेशाला 15 हजार कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य

    पहिल्यांदाच सरकारी नोकरी लागलेल्या 30 लाख युवकांचे एक महिन्याचे पीएफ आंशिकरित्या सरकार भरणार

  • 23 Jul 2024 01:34 PM (IST)

    Union Budget 2024 Live Update : सोने चांदीच्या शेअरमध्ये वाढ

    अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 10 टक्क्यांवरून 6 टक्के करण्याची घोषणा केली आहे. 5 टक्के AIDC जोडल्याने सोने आणि चांदीवरील एकूण आयात शुल्क आता 15 टक्क्यांवरून 11 टक्क्यांवर आले आहे. या घोषणेमुळे PC Jeweller, Senco Gold, Thangamayil Jewellery आणि Titan या ज्वेलरी कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

  • 23 Jul 2024 01:33 PM (IST)

    Union Budget 2024 Live Update : अर्थसंकल्पात महिलांसाठी काहीच नाही- खा. गायकवाड

    अर्थसंकल्पात महिलांसाठी काहीच योजना नाही. केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली.

  • 23 Jul 2024 01:31 PM (IST)

    Union Budget 2024 Live Update : खासदार वर्षा गायकवाड यांची टीका

    अर्थसंकल्पावर वर्षा गायकवाड यांनी टीका केली आहे. राज्यासाठी अर्थसंकल्पात काहीच नाही. त्यामुळे राज्यातील जनतेने महायुतीला आपली जागा दाखवावी, असे खासदार गायकवाड यांनी म्हटले आहे.

  • 23 Jul 2024 01:25 PM (IST)

    Union Budget 2024 Live Update : अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काही मिळाले नाही

    मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही. तसेच शेतकऱ्यांना देखील काहीच मिळाले नाही. आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्यांना जास्त फायदा झाला आहे. एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा सरकारला आधीत होता, त्यामुळे त्यांना काहीच दिले नाही, असे ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी म्हटले आहे.

  • 23 Jul 2024 01:15 PM (IST)

    Union Budget 2024 Live Update : महाविकास आघाडीच्या खासदारांचे आंदोलन

    अर्थसंकल्पानंतर महाविकास आघाडीच्या खासदारांनी आंदोलन केले. संसदेच्या प्रवेशद्वारावर खासदारांनी आंदोलन केले. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कोणती तरतूद नाही, असा आरोप करत काँग्रेस शिवसेना ठाकरे गटाचे खासदारांनी आंदोलन केले.

  • 23 Jul 2024 12:56 PM (IST)

    Union Budget 2024 Live Update : सरकारकडून पेन्शन धारकांना मोठा दिलासा

    नव्या टॅक्स रिजीममध्ये स्टँडर्ड डिडक्शनची लिमिट वाढवण्यात आली आहे. सरकारने पेन्शनधारकांना एक्स्ट्रा बेनिफिट दिलाय. पेन्शन धारकांना कौटुंबिक पेन्शनवर 25 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळेल. आधी ही लिमिट 15 हजार रुपये होती.

  • 23 Jul 2024 12:45 PM (IST)

    Union Budget 2024 Live Update : पीएम आवास योजनेतंर्गत शहरी गरीबांसाठी महत्त्वाची घोषणा

    शहरी आवास योजनेसाठी 10 लाख कोटींची तरतुद.

    1 कोटी शहरी गरीबांसाठी घर बांधणार.

    मध्यम वर्गीयांना सुद्धा या योजनेचा फायदा होईल.

    आता TDS वेळेवर न भरणं गुन्हा नसेल.

  • 23 Jul 2024 12:31 PM (IST)

    Union Budget 2024 Live Update : किती लाखापर्यंत उत्पन्नावर कर लागणार नाही? टॅक्स बाबत महत्त्वाच्या घोषणा

    नव्या कर प्रणालीत स्टँडर्ड डिडक्शन 50 हजार वरुन 75 हजार करण्यात आलय.

    3 लाखापर्यंतच्या उत्पनावर कर लागणार नाही.

    3 ते 7 लाखापर्यंतच्या उत्पनावर 5 टक्के कर लागणार.

    7 ते 10 लाखापर्यंत उत्पन्नावर 10 टक्के कर लागेल.

    10 ते 12 लाखापर्यंत उत्पन्नावर 15 टक्के कर.

    12 ते 15 लाख उत्पन्नावर 20 टक्के टॅक्स.

    15 लाखाहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना 30 टक्के कर लागणार.

  • 23 Jul 2024 12:25 PM (IST)

    Union Budget 2024 Live Update : कुठले टॅक्स कमी केले? कुठला बंद केला?

    कॅपिटल गेन टॅक्स 20 टक्क्यावरुन 12.5 टक्के.

    स्टार्ट अपला चालना देण्यासाठी एंजट टॅक्स बंद.

    विदेशी कंपन्यांच्या कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात. 40 वरुन 35 टक्के टॅक्स

  • 23 Jul 2024 12:15 PM (IST)

    Union Budget 2024 Live Update : सोने चांदी, इलेक्ट्रिक वाहनांबद्दल महत्त्वाची घोषणा

    कॅन्सरची तीन औषध स्वस्त होणार. या औषधांवर कस्टम ड्युटी लागणार नाही.

    सोने-चांदी स्वस्त होणार. सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 6 टक्क्यांनी घटवला.

    महिलांसाठी स्टॅम्प ड्युटीमध्ये बदल करणार.

    इलेक्ट्रिक वाहन स्वस्त होणार.

    मोबाईल, चार्जर स्वस्त होणार.

    एक्स रे मशिन स्वस्त होणार.

    चामड्यापासून, तांब्यापासून बनवलेल्या वस्तू स्वस्त होणार.

    लिथियम बॅटरी स्वस्त होणार.

    सौर ऊर्जा पॅनल स्वस्त.

    माशांपासून बनवलेली उत्पादन स्वस्त होणार.

  • 23 Jul 2024 12:12 PM (IST)

    Union Budget 2024 Live Update : कॅन्सरची तीन औषध स्वस्त होणार

    कॅन्सरची तीन औषध स्वस्त होणार. या औषधांवर कस्टम ड्युटी लागणार नाही.

  • 23 Jul 2024 12:05 PM (IST)

    Union Budget 2024 Live Update : ग्रामीण भागातील जमिनीच्या नोंदी बाबत महत्त्वाची घोषणा

    ग्रामीण भागातील जमिनीच्या नोंदींच डिजिटलायजेशन करणार.

    1 लाख रुपयापेक्षा कमी सॅलरी असणाऱ्यांना EPFO मध्ये पहिल्यांदा रजिस्टर होणाऱ्यांना तीन टप्प्यात 15 हजार रुपये मिळतील.

    राज्यांना बिनव्याजी 15 हजार कोटी कर्ज देणार.

    देशभरात 12 नवीन इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यात येणार.

    सूर्य घर योजनेत 1 कोटी घरांना सौर ऊर्जा पॅनल देणार. 300 युनिट पर्यंत मोफत वीज देणार.

    विष्णुपद मंदिर आणि महाबोधी मंदिराला काशी विश्वनाथच्या धर्तीवर विकसित केलं जाईल. त्यांनी इथे कॉरिडोर बनवण्याची घोषणा केली आहे.

  • 23 Jul 2024 11:57 AM (IST)

    Union Budget 2024 Live Update : शेती आणि पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी किती तरतूद?

    प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-4 ची घोषणा.

    पायाभूत सुविधांसाठी 11 लाख कोटींचा निधी देण्यात येणार.

    1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणार.

    काशी विश्वनाथ कॉरिडोअरसाठी विशेष, अधिकच्या निधीची तरतूद.

    हिंदू, बौद्ध, जैन धर्मस्थळांचा विकास करण्यात येणार.

    नालंदा विद्यापीठात टुरिरस्ट केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न.

    कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतुदी

  • 23 Jul 2024 11:45 AM (IST)

    Union Budget 2024 Live Update : बजेटमध्ये आतापर्यंत काय घोषणा?

    खाद्य गुणवत्ता तपासणीसाठी 100 लॅब उघडणार.

    3O लाख तरुणांच्या रोजगारासाठी केंद्र सरकारची योजना.

    500 कंपन्यांमध्ये इंर्टनशिप देणार, 5 हजार महिना मिळणार.

    नवे व्यवसाय करण्यासाठी तरुणांना कर्ज उपलब्ध करुन देणार.

    100 शहरांमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी योजना.

    मुद्रा लोनची मर्यादा आता 20 लाख रुपये.

    महिला, मुलींसाठी 3 लाख कोटीच्या योजना.

  • 23 Jul 2024 11:41 AM (IST)

    Union Budget 2024 Live Update : उच्च शिक्षणात सरकारकडून मिळणार मदत

    रोजगार आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाशी संबंधित 5 योजनांसाठी 2 लाख कोटींची तरतुद करण्यात आली आहे. देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी 10 लाख कर्जावर सरकारकडून मदत देण्यात येईल.

  • 23 Jul 2024 11:30 AM (IST)

    Union Budget 2024 Live Update : आंध्र प्रदेश-बिहारसाठी खास घोषणा

    आंध्र प्रदेशला अतिरिक्त 15 हजार कोटीचा निधी देणार. चेन्नई ते विशाखापट्टम इंडस्ट्रीयल कॉरिडोअर बांधणार. बिहारमध्ये रस्ते बांधणासाठी 26 हजार कोटी देणार. त्याशिवाय बिहारमध्ये मेडीकल कॉलेज होणार.

  • 23 Jul 2024 11:24 AM (IST)

    Union Budget 2024 Live Update : कुठल्या चार जातींवर विशेष लक्ष

    अंतरिम बजेटमध्ये गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार जातींवर लक्ष केंद्रीत करण गरजेच असल्याच म्हटलं होतं. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत सर्व प्रमुख पिकांना उच्च न्यूनतम समर्थन मूल्याची घोषणा केली आहे.

  • 23 Jul 2024 11:20 AM (IST)

    Union Budget 2024 Live Update : कुठल्या क्षेत्रांना प्राधान्य असेल?

    बजेटमध्ये रोजगार, कौशल्य आणि MSME यावर फोकस असेल, असं निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं. उत्पादकता, रोजगार, कौशल्य, उत्पादन, सेवा, एनर्जी, सुरक्षा, इन्फ्रास्ट्रक्चर, जमीन सुधारणा, शहरी विकास आणि सुधारणा या नऊ क्षेत्रांना प्राधान्य असेल असं सीतारमण म्हणाल्या.

  • 23 Jul 2024 11:15 AM (IST)

    Union Budget 2024 Live Update : भारतात महागाई दर किती टक्के?

    “भारतात महागाई दर 4 टक्के आहे. लोकांनी सरकारवर विश्वास दाखवलाय. आमच्या धोरणांवर विश्वास दाखवला आहे. भारताची अर्थव्यवस्था चमकत आहे” असं निर्मला सीतारमण म्हणाल्या.

  • 23 Jul 2024 11:12 AM (IST)

    Union Budget 2024 Live Update : या योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ

    “प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सध्या कठीण काळ. भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास होत राहील” रोजगार वाढवणं लक्ष्य असल्याच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.

  • 23 Jul 2024 11:05 AM (IST)

    Union Budget 2024 Live Update : निर्मला सीतारमण यांच्याकडून बजेट सादर

    संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून संसदेत बजेट वाचन सुरु. ते 2024-25 वर्षासाठी संसदेत बजेट मांडत आहेत.

  • 23 Jul 2024 10:48 AM (IST)

    Union Budget 2024 Live Update : बजेट आधीच काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

    बजेट सादर होण्याआधीच काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “बजेटच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी त्या करोडपतींना मदत करतील, जे त्यांचे निकटवर्तीय आहेत. मध्यम वर्ग आणि प्रामाणिक करदात्यांना पोकळ आश्वासनांशिवाय काही मिळणार नाही” असं काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले.

  • 23 Jul 2024 10:18 AM (IST)

    Union Budget 2024 Live Update : कॅबिनेट बैठकीसाठी संसदेत दाखल होतायत मंत्री

    संसदेत कॅबिनेट बैठकीसाठी मंत्री येत आहेत. मनसुख मांडवीय, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर बैठकीला पोहोचले आहेत. केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुद्धा या बैठकीला हजर आहेत.

  • 23 Jul 2024 09:52 AM (IST)

    Union Budget 2024 Live Update : बजेटआधी शेअर बाजार पॉझिटिव्ह

    बजेट घोषणेच्या आधी शेअर बाजारात तेजी दिसून येतेय. सेन्सेक्समध्ये 200 पेक्षा जास्त अंकांची तेजी दिसून येतेय. निफ्टीमध्ये 60 अंकांची वाढ झाली आहे. रेल्वे आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या स्टॉकमध्ये तेजी दिसून येतेय. एक दिवस आधी मंगळवारी शेअर बाजारात 100 पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली होती.

  • 23 Jul 2024 09:13 AM (IST)

    Union Budget 2024 Live Update : निर्मला सीतारमण अर्थ मंत्रालयात पोहोचल्या

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थ मंत्रालयात पोहोचल्या आहेत. त्या 11 वाजल्यापासून संसदेत बजेट सादर करतील. बजेटच त्यांचं भाषण 45 मिनट ते 1 तास असेल.

  • 23 Jul 2024 09:10 AM (IST)

    Union Budget 2024 Live Update : ‘बजेटकडून जास्त अपेक्षा नका ठेऊ’

    “बजेट फक्त 3 ते 4 महिन्यांच आहे. बजेटमध्ये मोठ्या घोषणा होणार नाहीत. जास्त अपेक्षा ठेऊ नका” असं वरिष्ठ पत्रकार अंशुमान तिवारी यांनी म्हटलं आहे. बँकेत FD वर जास्त व्याजदराची घोषणा होऊ शकते, असं ते म्हणाले.

  • 23 Jul 2024 08:39 AM (IST)

    Agriculture 2024 Live Update : या दोन क्षेत्रांसाठी बजेटमध्ये खास घोषणा होणार का?

    बजेटमध्ये सरकार इन्फ्रास्ट्रक्चर आणि कृषी या दोन क्षेत्रांसाठी खास घोषणा करु शकते. मोदी सरकार यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी सम्मान निधी, पीएम किसान योजनेसंदर्भात काही मोठ्या घोषणा करु शकते. कृषी क्षेत्राचा विकास दर वाढवण्यासाठी काही घोषणा अपेक्षित आहेत.

  • 23 Jul 2024 08:35 AM (IST)

    Employment Budget 2024 Live Update : वर्षाला किती लाख नोकऱ्या निर्माण करण्याची गरज

    बजेटमध्ये रोजगारावर फोकस असेल. वाढत्या वर्कफोर्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नॉन-एग्रीकल्चर सेक्टरमध्ये 2030 पर्यंत वर्षाला सरासरी 78.5 लाख नोकऱ्या निर्माण करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे इकोनॉमी ग्रोथ कायम ठेवायची असेल, तर वर्षाला 78 लाख नोकऱ्या निर्माण होणं गरजेच आहे. त्यामुळे डिमांड आणि सप्लायमध्ये कमी येणार नाही. संतुलन कायम राहील.

  • 23 Jul 2024 08:01 AM (IST)

    Union Budget 2024 Live Update : महागाई कमी होणार की वाढणार?

    Union Budget 2024 Live Update : यंदाच्या अर्थसंकल्पात महिला, तरुण, शेतकरी आणि गरीबांवर लक्ष केंद्रीत केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच विद्यमान अर्थसंकल्प हा रोजगारावर भर देणारा, महिला स्वयंरोजगारात वाढ करणारा, त्याचप्रमाणे खाजगी गुंतवणुकीचा वेग वाढविण्यास मदत करण्यास सहाय्य करेल. तसेच या अर्थसंकल्पातून महागाई कमी होण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

  • 23 Jul 2024 07:58 AM (IST)

    Union Budget 2024 Live Update : यंदाच्या अर्थसंकल्पात आयकर स्लॅबमध्ये होणार बदल?

    Union Budget 2024 Live Update : 2024 च्या बजेटमध्ये सर्वासामान्य लोकांना मोठी आशा आहे. देशात मध्यमवर्गीय लोकांची संख्या जास्त आहे. ५ ते १५ लाखापर्यंत उत्पन्न असलेले लोकं अधिक आयटीआर दाखल करतात. पण यंदाच्या बजेटमध्ये करात सूट मिळावी अशी त्यांना आशा आहे. त्यामुळे बजेट २०२४ मध्ये काय घोषणा होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

  • 23 Jul 2024 07:56 AM (IST)

    Union Budget 2024 Live Update : यंदाचा अर्थसंकल्प 47 लाख 65 हजार 768 कोटींचा

    Union Budget 2024 Live Update : यंदा निवडणुकीचे वर्ष आहे, त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारमन या महाराष्ट्राला काय गिफ्ट देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यंदाचा अर्थसंकल्प 47 लाख 65 हजार 768 कोटींचा असणार आहे.

  • 23 Jul 2024 07:53 AM (IST)

    Union Budget 2024 Live Update : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन 11 वाजता सादर करणार अर्थसंकल्प

    Union Budget 2024 Live Update : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. तर अर्थमंत्री सीतारामन यांचा सलग सातवा अर्थसंकल्प सादर करतील.

  • 23 Jul 2024 07:50 AM (IST)

    Union Budget 2024 Live Update : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरुवात, लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर

    Union Budget 2024 Live Update : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी 22 जुलैपासून सुरु झाले. या अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले. या अहवालामधून देशातील कृषी क्षेत्र आणि रोजगार यावर जास्त भर देण्यात आला आहे. त्याचेच प्रतिबिंब आज सादर होणाऱ्या अर्थ संकल्पावर दिसेल, असे बोललं जात आहे.