मुंबई : केंद्रीय आरोग्य मंत्रालय (Health Ministry) लवकरच अनेक नियम बदलणार आहे. त्यात सर्वात मोठा बदल होम आयसोलेशन(Home Isolation)च्या मार्गदर्शक तत्त्वात झालाय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ते जारी तेलेत. आरोग्य मंत्रालयानं सौम्य किंवा लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांच्या होम आयसोलेशनसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे (Home Isolation New Rules) जारी केलीत. मुद्द्यांच्या स्वरुपात ती पाहू या..
1. लक्षणं नसलेला रुग्ण
– कोविड चाचणी पॉझिटिव्ह
– ऑक्सिजन पातळी 93 टक्क्यांपेक्षा जास्त
2. सौम्य लक्षणं
– कोविडची चाचणी पॉझिटिव्ह
– घसा खवखवणे, श्वास घेण्यास मात्र त्रास नसणे
– ऑक्सिजन पातळी 93 टक्क्यांपेक्षा जास्त
– ताप असेल किंवा नसेलही
3. होम आयसोलेशन
– सौम्य लक्षणं असतील तरच होम आयसोलेशन करावं
– इतर कोणते आजार असतील त्याचबरोबर वयोवृद्ध व्यक्तींना होम आयसोलेशनसाठी डॉक्टरांची परवानगी लागेल
4. होम आयसोलेशन प्रक्रिया
– रुग्णासाठी घरात पूर्णत: वेगळी व्यवस्था असावी
– लसींचे दोन डोस पूर्ण असलेल्यानेच रुग्णाची देखभाल करावी
– संबंधित व्यक्ती डॉक्टरांच्या सतत संपर्कात असावी
5. रुग्णांसाठी नियम
– रुग्णानं तीन पदरी मास्क वापरावा
– 8 तास वापरल्यानंतर तो फेकून द्यावा
– वेळोवेळी ऑक्सिजन पातळी तपासावी. ती 93टक्क्यांहून अधिकच असायला हवी
– संतुलित आहार घ्यावा
– किमान 40 सेकंद साबणानं हात धुवावेत किंवा सॅनिटायझर वापरावा
– गरम पाण्याच्या गुळण्या कराव्या
– दिवसातून किमान तीनवेळा वाफ घ्यावी
– ताप कमी होत नसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानं पॅरासिटामॉल घ्यावी
– इतर कोणत्याही चाचण्या, जसे की एक्स-रे, सीटीस्कॅन, रक्त आदी चाचण्या डॉक्टरांना विचारूनच कराव्या
– कोणतंही औषध स्वत: घेऊ नये, डॉक्टरांना विचारूनच घ्यावं
6. रुग्णासोबत असलेल्यांसाठीचे नियम
– देखभाल करणाऱ्यास मास्क आवश्यक
– रुग्णाच्या वस्तू, भांडी इतरांना वापरू नये
– साबण, सॅनिटायझर वापरणं आवश्यक
7. महत्त्वाचं
– ऑक्सिजन पातळी 93 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास…
– श्वास घेण्यास त्रास होत असल्यास…
– सलग तीन दिवस ताप असेल तर…
– आणि छातीत दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला गरजेचा आहे.