केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांच्या मुलीचं निधन; कोरोनावर उपचार सुरु असताना आला हार्ट अ‍ॅटॅक

| Updated on: May 03, 2021 | 2:36 PM

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांची कन्या योगिता सोलंकी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. (Union minister Thawar Chand Gehlot’s daughter succumbs to Covid in Indore)

केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांच्या मुलीचं निधन; कोरोनावर उपचार सुरु असताना आला हार्ट अ‍ॅटॅक
Yogita Solanki
Follow us on

नवी दिल्ली: केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांची कन्या योगिता सोलंकी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. कोरोनावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 43 वर्षाच्या होत्या. (Union minister Thawar Chand Gehlot’s daughter succumbs to Covid in Indore)

योगिता सोलंकी यांच्यावर गेल्या पंधरा दिवसांपासून इंदौरच्या मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच आज त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांची प्राणज्योत मालवली.

कोरोनाचे मृत्यू वाढले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चुलती नर्मदाबेन मोदी यांचाही गेल्या आठवड्यात कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या वडिलांचं रविवारी निधन झालं. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि खासदार सुशील कुमार मोदी यांच्या भावाचंही काल कोरोनाने निधन झालं.

ऑक्सिजन अभावी 24 जणांचा मृत्यू

ऑक्सिजनच्या पुरवठ्या अभावी कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या घटना काही कमी होताना दिसत नाही. कर्नाटकाच्या एका सरकारी रुग्णालयात रुग्णांना वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णालयात ऑक्सिजन उशिराने पोहोचल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं. म्हैसूरच्या चामराज नगर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

रोज तीन लाख रुग्णांची भर

देशात कोरोनाचं संकट प्रचंड वाढलं आहे. देशात रोज तीन लाखाहून अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. तर तीन हजाराहून अधिक लोकांचा रोज मृत्यू होत आहे. देशात सध्या 34 लाखाहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. तर मृतांचा आकडा दोन लाखांवर गेला आहे.

देशातील कोरोनाबाधितांची एकूण आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्त : 1 कोटी 99 लाख 25 हजार 604
कोरोना उपचारानंतर बरे झालेले एकूण रुग्ण : 1 कोटी 62 लाख 93 हजार 003
देशातील एकूण कोरोनाबळी : 2 लाख 18 हजार 959
देशातील एकूण सक्रिय कोरोना रुग्ण : 34 लाख 13 हजार 642  (Union minister Thawar Chand Gehlot’s daughter succumbs to Covid in Indore)

 

संबंधित बातम्या:

राज्यात एप्रिल महिन्यात कोरोनामृतांची संख्या 25 टक्क्यांनी वाढली, सर्वाधिक मृत्यूदर कोणत्या जिल्ह्यात?

Maharashtra Corona | राज्यात दिवसभरात 669 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू, 56 हजार 647 नवे कोरोनाबाधित, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

India Corona Cases | भारतातील नागरिकांना दिलासा, कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात काहीशी घट

(Union minister Thawar Chand Gehlot’s daughter succumbs to Covid in Indore)