Fit India: फिट इंडिया अभियानाची दोन वर्ष, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर मोबाईल ॲप लाँच करणार

| Updated on: Aug 26, 2021 | 6:06 PM

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर 29 ऑगस्ट, 2021 रोजी फिट इंडिया मुव्हमेंटच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त फिट इंडिया मोबाईल ॲप्लिकेशन लाँच करणार आहेत. ॲप्लिकेशन लाँच करण्याचा कार्यक्रम दिल्लीतील प्रसिद्ध मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडणार आहे.

Fit India: फिट इंडिया अभियानाची दोन वर्ष, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर मोबाईल ॲप लाँच करणार
Anurag Thakur
Follow us on

नवी दिल्ली: केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर 29 ऑगस्ट, 2021 रोजी फिट इंडिया मुव्हमेंटच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त फिट इंडिया मोबाईल ॲप्लिकेशन लाँच करणार आहेत. ॲप्लिकेशन लाँच करण्याचा कार्यक्रम दिल्लीतील प्रसिद्ध मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडणार आहे. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग , कुस्तीपटू संग्राम सिंह व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होतील. सध्या फिट इंडिया अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा एक भाग म्हणून फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 चे आयोजन देखील करण्यात येणार आहे.

प्रसिद्ध मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर कार्यक्रम

फिट इंडिया अभियानाचा दुसरा वर्धापन दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्याभाग म्हणून युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर 29 ऑगस्टला फिट इंडिया मोबाईल ॲप लाँच करतील. हा कार्यक्रम दिल्लीच्या प्रसिद्ध मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक उपस्थित असतील. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग , कुस्तीपटू संग्राम सिंह , क्रीडा लेखक अयाज मेमन , एअर इंडियाची कर्णधार एनी दिव्या , एक विद्यार्थी आणि एक महिला या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती लावणार आहेत. अ‌ॅप लाँच झाल्यानंतर फिट इंडिया ॲप कसे वापरावे याचा नमुना सादर केला जाणार आहे.

29 ऑगस्टपासून उपलब्ध

फिट इंडिया ॲप अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. हे अ‌ॅप साध्या स्मार्टफोनवरही काम करेल हे लक्षात घेऊन विकसित केले गेले आहे. फिट इंडियाच्या फेसबुक पेजवर हा सोहळा पाहता येईल. ॲप 29 ऑगस्टपासून गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवर मोफत डाऊनलोड करता येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 ऑगस्ट, 2019 रोजी भारताला एक फिट आणि निरोगी राष्ट्र बनवण्याचे स्वप्न घेऊन फिट इंडिया अभियान सुरू केलं होतं. गेल्या दोन वर्षात , फिट इंडियाच्या माध्यमातून विविध फिटनेस मोहिमा , फिट इंडिया फ्रीडम रन, फिट सायक्लोथॉन अंतर्गत देशातील लाखो लोकांना यासोबत जोडण्याचा प्रयत्न झाला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 आयोजित करण्यात येणार आहे आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे.

इतर बातम्या

संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश, पैठणचे रुपडे पालटणार

BAMU: विद्यापीठातील विद्यार्थ्यांची शुल्ककपात, जाणून घ्या सविस्तर

कोरोनाने पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ, औरंगाबाद विद्यापीठ अनाथ विद्यार्थ्यांचं पालकत्व स्वीकारणार

Union Sports Minister Anurag Thakur will launch Fit India App on 29 August