नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह देशातील 5 राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक (Uttar Pradesh Assembly Election 2022) होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Vadra) यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. इतकंच नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबतही त्याच निर्णय घेणार असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस जोरदारपणे तयारीला लागली असल्याचं पाहायला मिळत आहे. (Congress will contest UP Assembly elections under the leadership of Priyanka Gandhi)
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी सांगितलं की आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात लढवली जाईल. काँग्रेसच्या विजयासाठी त्या कठोर परिश्रम करत आहेत. प्रियंका गांधीच काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करतील, असंही सलमान खुर्शीद यांनी म्हटलंय. ते आज माध्यमांशी बोलत होते.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी सातत्याने पक्ष संघटना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. अशावेळी प्रियंका गांधी रायबरेलीमध्ये दोन दिवसीय दौऱ्यावर पोहोचल्या आहेत. तिथे त्यांनी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांचं मनोबल वाढवण्यावर भर दिला. यावेळी गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपला ना जनतेच्या प्रश्नांची जाण आणि ना त्यांच्याशी काही देणंघेणं. हे फक्त खोट्या जाहिराती आणि बोगस आश्वासनांचं सरकार असल्याचा घणाघात गांधी यांनी यावेळी केला.
कांग्रेस कार्यालय पर प्रदेश संगठन की बैठकों में पदाधिकारियों एवं जिले के नेताओं से रिपोर्ट व फीडबैक लिया।
उप्र में जनता बदलाव का मन बना चुकी है। किसानों, नौजवानों, महिलाओं, व्यापारी वर्ग व आमजनों की आवाज बन कांग्रेस पार्टी परिवर्तन के संकल्प के साथ मजबूत विकल्प बनकर उभरेगी। pic.twitter.com/bYeVlOL4uK
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) September 11, 2021
प्रियंका गांधी गुरुवारी संध्याकाळी उत्तर प्रदेश दौऱ्यावर पोहोचल्या. त्यानंतर रविवारी त्यांनी काँग्रेस अध्यक्षा आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ असल्या रायबरेलीमध्ये निवडणूकपूर्व परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. तसंच फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
इनका काम ही है झूठे विज्ञापन देना। फर्जी लेखपाल बनाकर उप्र के युवाओं को रोजगार देने का झूठ बोला और अब फ्लाईओवर व फैक्ट्रियों की फर्जी तस्वीरें लगाकर विकास के झूठे दावे कर रहे हैं।
न जनता के मुद्दों की समझ है और न ही उनसे कोई सरोकार है, बस झूठे विज्ञापन और हवाई दावों की सरकार है।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) September 12, 2021
दरम्यान, एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्वेक्षणात उत्तर प्रदेशातील 45 टक्के लोक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या कामाकाजावर समाधानी आहेत. तर 34 टक्के लोक असमाधानी आहेत. तर विरोधी पक्षांनी आपली भूमिका योग्यरित्या निभावली का? असा सवालही मतदारांना विचारण्यात आला होता. त्यावेळी 40 टक्के लोकांनी विरोधी पक्षाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलंय. तर 34 टक्के लोक विरोधकांवर नाराज आहेत.
इतर बातम्या :
ZP Elections : जिल्हा परिषद निवडणुकांची तारीख जाहीर; आता राज्य सरकार, विरोधी पक्ष काय भूमिका घेणार?
Congress will contest UP Assembly elections under the leadership of Priyanka Gandhi