मुंबई : उत्तर भारतातील (North India) विविध राज्ये राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह गेल्या अनेक दिवसांपासून कडक उष्णतेमुळे तापत आहेत. तर वाढत्या गर्मीमुळे नागरिकांच्यी लाहीलाही होत आहे. तर गेल्या रविवारी दिल्लीतील कमाल तापमानाने 49 अंशांचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे कडक उन्हात नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असा इशाराही देण्यात आला आहे. यूपी-बिहार, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये सध्या प्रचंड उकाडा जाणवत आहे. मात्र, याच दरम्यान देशात मान्सूननच्या (Monsoon) आगमणच्या बातमीने अनेकांना दिलासा मिळत आहे. मान्सून नुकताच अंदमान आणि निकोबारमध्ये दाखल झाला असून तो 27 मे रोजी केरळमध्ये पोहोचेल असा विश्वास आहे. मान्सून कोणत्या राज्यात कधीपर्यंत पोहोचेल, याची माहितीही हवामान खात्याने (Meteorological Department) दिली आहे.
Advancement of Southwest Monsoon:
• The Northern Limit of Southwest Monsoon continues to pass through 5°N/80°E, 8°N/85°E, 11°N/90°E, Long Islands and 14.8°N/97.5°E. pic.twitter.com/MZVCyo1B9k हे सुद्धा वाचा— India Meteorological Department (@Indiametdept) May 17, 2022
तर येत्या दोन दिवसांत दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती पूर्णपणे अनुकूल असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. पुढील 5 दिवस अंदमान आणि निकोबार बेटांवर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. तर पुढील 3 दिवसांत अंदमान समुद्र, आग्नेय बंगालचा उपसागर आणि मध्य बंगालच्या उपसागरावर 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून पंजाबमध्ये कडाक्याच्या उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये 18 मेपासून उष्मा आणखी वाढणार आहे. विशेष म्हणजे 16 आणि 17 मे रोजी किंचित धुळीच्या वातावरणामुळे लोकांना कडक उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला होता. बुधवारपासून पुन्हा एकदा उष्णतेने आपला प्रकोप दाखविल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.
हवामान खात्याने मान्सूनबाबतचा संपूर्ण नकाशा जाहीर केला असून मान्सून कोणत्या राज्यात कधी पोहोचेल, हे सांगितले आहे. 16 मे रोजी मान्सून अंदमानात पोहोचला आहे. यानंतर 1 जून रोजी लक्षद्वीपला पोहोचणे अपेक्षित आहे. 10 जून रोजी महाराष्ट्रात पोहोचेल. त्याच वेळी, 15 जून रोजी ते मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार इत्यादी राज्यांमध्ये पोहोचेल. त्याच वेळी, मान्सून 20 जून रोजी उत्तर प्रदेशात दाखल होण्याची शक्यता आहे. 20 आणि 25 जूनपर्यंत गुजरातच्या बहुतांश भागात मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. 30 जून रोजी राजस्थानच्या विविध भागात मान्सूनचा पाऊस पडेल. उत्तराखंडबद्दल बोलायचे झाले तर येथे 20 जूनला मान्सून दाखल होईल. 25 जूनला मान्सून जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.