लखनऊ : एसडीएम ज्योती मौर्यवर नवरा आलोक मौर्यने गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर दोघांमध्ये दुरावा वाढला. मीडियाशी बोलताना आलोक मौर्यने आमच्या दोघांमध्ये वादाच खरं कारण मनीष दुबे असल्याच सांगितलं. आलोक मौर्यच्या तक्रारीनंतर मनीष दुबेची चौकशी सुरु झाली. दुसऱ्याबाजूला त्याच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. दरम्यान आलोक मौर्यने पत्नी ज्योती मौर्य सोबतच्या संबंधांवर मोठं वक्तव्य केलं आहे.
ज्योती आणि माझ्यात 2010 ते 2020 पर्यंत कुठलाही वाद नव्हता. सर्व काही व्यवस्थित सुरु होतं. पण अचानक मनीष दुबेच्या एंट्रीमुळे आमच कुटुंब मोडलं. आलोक मौर्यने पत्नी ज्योतीसोबतच्या वादासाठी थेट मनीष दुबेला जबाबदार ठरवलय.
आलोककडे काय पुरावे आहेत?
मीडियाशी बोलताना आलोक मौर्यने त्याच्याकडे पत्नी ज्योती मौर्य आणि मनीष दुबे यांच्या चर्चेची ऑडिओ क्लिप असल्याच सांगितलं. त्याशिवाय दोघांमध्ये बरच बोलण व्हायचं, त्याचे पुरावे असल्याच सांगितलं. संसार मोडू नये, यासाठी मी प्रयत्न केले. पण मनीष दुबेमुळे नात्यात दुरावा आला.
ज्योतीसाठी तडजोड करायला तयार, पण अट काय?
हा वादा आता खूपच पुढे गेलाय. पण दोन मुलांसाठी मी तडजोड करायला तयार आहे, असं आलोक मौर्यने सांगितलं. यासाठी ज्योती मौर्यला मनीषला सोडावं लागेल. आलोक मौर्यने ज्योतीबद्दल सहानुभूती व्यक्त करणाऱ्यांवरही टीका केली. “मनीष दुबेमुळे आमचं कुटुंब मोडलं, आज त्याच्या पत्नीची सुद्धा फसवणूक झाल्याची भावना असेल. त्याच्या पत्नीनन मनीष दुबे विरोधात तक्रार नोंदवलीय. ज्योती मौर्यबद्दल सहानुभूमी बाळगणाऱ्यांनी मनीष दुबेच्या बायकोबद्दलही सहानुभूती बाळगावी” असं आलोक म्हणाला.
आलोकने दोघांना कसं पकडलं?
आलोकने पत्नी ज्योती मौर्यवर 6.50 लाख रुपयांची बेकायद वसुली केल्याचा आरोप केला आहे. याचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याच त्याने सांगितलं. “ज्योतीच्या लखनऊला फेऱ्या वाढल्या होत्या. मला तिच्यावर संशय आला. म्हणून मी तिचा पाठलाग केला. त्यावेळी मी दोघांना हॉटेलमधून निघताना रंगेहात पकडले” असं आलोकने म्हटलं. “ज्योती आणि मनीषने हॉटेल रुममध्ये अनेक रात्री एकत्र घालवल्यात” असा आरोप आलोकने केला.