मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (Uattar Pradesh Election) पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी गुरुवारी लखनऊमध्ये त्यांचे काका शिवपाल यादव (Shivpal Yadav) यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर अखिलेश यादव यांनी जाहीर केलं की समाजवादी पक्ष आणि शिवपाल यादव यांची ‘प्रगतिशील समाजवादी पार्टी लोहिया’ पक्ष मिळून निवडणूक लढतील. दरम्यान, समाजवादी पक्ष शिवपाल यादवांच्या पक्षाला किती जागा देणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, शिवपाल यादव समर्थकांना 15 जागा दिल्या जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रसपा के राष्ट्रीय अध्यक्ष जी से मुलाक़ात हुई और गठबंधन की बात तय हुई।
क्षेत्रीय दलों को साथ लेने की नीति सपा को निरंतर मजबूत कर रही है और सपा और अन्य सहयोगियों को ऐतिहासिक जीत की ओर ले जा रही है। #बाइस_में_बाइसिकल pic.twitter.com/x3k5wWX09A
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) December 16, 2021
उत्तर प्रदेशची सत्ता पुन्हा काबिज करण्यासाठी अखिलेश यादव प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. त्यामुळेच अखिलेश यादव यांनी आपले काका शिवपाल यादव यांच्याशी खातं जुळवून घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अखिलेश यांनी अनेक सार्वजनिक व्यासपीठावरुन सांगितलं की काकांचा योग्य सन्मान केला जाईल. राजकीय लढाईत ते आमच्यासोबत आहेत. इतकंच नाही तर शिवपाल यादव यांचे जवळच्या नेत्यांना अॅडजस्ट करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.
आज समाजवादी पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री अखिलेश यादव जी ने आवास पर शिष्टाचार भेंट की। इस दौरान उनके साथ आगामी विधान सभा चुनाव 2022 में साथ मिलकर चुनाव लड़ने की रणनीति पर विस्तार से चर्चा हुई। pic.twitter.com/LH9CmvSXEd
— Shivpal Singh Yadav (@shivpalsinghyad) December 16, 2021
मुलायम सिंह यादव यांच्या परिवारातील महत्वपूर्ण सदस्यांमधील वाद देशापासून लपलेला नाही. अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल यादव यांच्यातील विवाद 2016 मध्ये समोर आला होता. बराच काळ हा तणाव चालू होता. या घरगुती लढाईत अखिलेश यादव यांचा विजय झाला होता. त्यानंतर मात्र अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांनी परिवारात कुठलीही लढाई नसल्याचं सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे काका-पुतणे पुन्हा एकत्र येत आहेत.
इतर बातम्या :