नवी दिल्ली: देशात कोरोनाची साथ आली तेव्हापासून कोरोनासंबंधी दररोज काहीतरी नव्या आणि उलटसुलट गोष्टी कानावर ऐकायला येतात. अमुक-तमूक घरगुती उपायाने कोरोना बरा होतो, अमूक गोष्ट गेल्यास कोरोना (Coronavirus) वाढतो, तमूक केल्यास जीवाचा धोका उद्भवू शकतो, अशा अनेक अफवांचे पेवही फुटले आहे. (Fact check Prolonged use of mask leads excess carbon dioxide lack of oxygen in body)
यामध्ये आता एका नव्या गोष्टीची भर पडली आहे. सध्या सोशल मीडियावर सतत मास्क परिधान केल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्याचा एक मेसेज फिरत आहे. हा मेसेज प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र, कोरोनाविरुद्धच्या लढाईतील प्रमुख शस्त्र असलेल्या मास्कच्या वापराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने अनेक सामान्य लोक बुचकाळ्यात पडले आहेत.
It is being claimed in a message that prolonged usage of masks leads to intoxication of CO2 & oxygen deficiency in the body.#PIBFactCheck: This claim is #FAKE. Stop the spread of Coronavirus by wearing mask properly, maintaining social distance and washing hands regularly. https://t.co/EYcl3JxJPO pic.twitter.com/PN6wAFOp3F
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 10, 2021
मानवी शरीराला दिवसात 550 लीटर ऑक्सिजनची गरज असते. एरवी ही गरज सहजपणे पूर्ण होते. मात्र, मास्क परिधान केल्यास शरीराला फक्त 250 ते 300 लीटर ऑक्सिजनचाच पुरवठा होतो. तसेच मास्क लावल्याने शरीरातील कार्बनडायऑक्साईडची पातळीही वाढते. त्यामुळे मास्क घालणे धोकादायक ठरु शकते, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोच्या (Press information bearu) फॅक्ट टीमने याची पडताळणी केली. त्यानंतर या गोष्टी काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले. मास्कचा वापर केल्यामुळे ऑक्सिजन पातळी खालावत असल्याचा मेसेज फेक आहे. असा कोणताही शास्त्रीय पुरावा आढळलेला नाही, असे प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोने म्हटले आहे.
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट (Corona Cases in India) पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात साडेतीन लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. गेले काही दिवस 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत होती. मात्र आता सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात भारतात 3 लाख 29 हजार 942 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 876 रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 56 हजार 82 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
(Fact check Prolonged use of mask leads excess carbon dioxide lack of oxygen in body)