‘अबू आझमींना पार्टीतून काढा किंवा उत्तर प्रदेशात पाठवा, चांगला उपचार करणार’, योगी आदित्यनाथ भडकले

| Updated on: Mar 05, 2025 | 2:53 PM

cm yogi adityanath on abu azmi: एकीकडे तुम्ही महाकुंभावर टीका करत आहात. दुसरीकडे औरंगजेबचे कौतूक करत आहात. त्या औरंगजेबने देशातील मंदिरे नष्ट केली. तुम्ही त्या आमदारावर कारवाई का नाही करत? त्याच्या वक्तव्याचा निषेध का नाही करत? असा प्रश्न योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाला विचारला.

अबू आझमींना पार्टीतून काढा किंवा उत्तर प्रदेशात पाठवा, चांगला उपचार करणार, योगी आदित्यनाथ भडकले
abu azmi, Yogi Adityanath
Image Credit source: TV 9 Marathi
Follow us on

cm yogi adityanath on abu azmi: समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांना औरंगजेबचे गुणगान करणे चांगलेच महागात पडले. त्यांच्या त्या वक्तव्यांच्या विरोधात महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर राज्याच्या विधानसभेत त्याचे पडसाद उमटले. भाजप-शिवसेनेने अबू आझमींना घेरले. तसेच त्यांचा निलंबनाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर संपूर्ण अधिवेशन काळापर्यंत अबू आझमी यांना निलंबित करण्यात आले. आता उत्तर प्रदेशच्या विधानसभेतही त्याचे पडसाद उमटले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अबू आझमी यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. त्यांना पक्षातून काढा किंवा उत्तर प्रदेशात पाठवा. उत्तर प्रदेशात अशा लोकांचा चांगला उपचार होतो, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.

त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही…

योगी आदित्यनाथ म्हणाले की, समाजवादी पक्ष अशा लोकांना आदर्श म्हणजे जे जनतेवर जिझिया कर लावत होते. या लोकांची पक्षातून हकालपट्टी करायला हवी. या लोकांना उत्तर प्रदेशात पाठवून द्या, त्यांचा चांगला उपचार केला जाईल. जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभिमान करण्याऐवजी औरंगजेबचे गुणगान करतो. त्याला आदर्श मानतो. त्याला व्यक्तीला आमच्या देशात राहण्याचा अधिकार नाही? समाजवादी पक्षाने त्याचे उत्तर दिले पाहिजे.

हे सुद्धा वाचा

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, एकीकडे तुम्ही महाकुंभावर टीका करत आहात. दुसरीकडे औरंगजेबचे कौतूक करत आहात. त्या औरंगजेबने देशातील मंदिरे नष्ट केली. तुम्ही त्या आमदारावर कारवाई का नाही करत? त्याच्या वक्तव्याचा निषेध का नाही करत? असा प्रश्न योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाला विचारला.

सपा आता डॉ.लोहिया यांच्या तत्त्वांपासून दूर

योगी आदित्यनाथ म्हणाले, समाजवादी पक्ष डॉ.लोहिया यांच्या तत्त्वांपासून दूर गेला आहे. त्यांनी औरंगजेबाला आपला आदर्श मानला आहे. तुम्ही जाऊन शहाजहानचे चरित्र वाचा. औरंगजेब भारताच्या श्रद्धेवर हल्ला करणार होता, तो भारताचे इस्लामीकरण करण्यासाठी आला होता. यामुळे कोणताही सुसंस्कृत माणूस आपल्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवत नाही.