प्रेमासाठी माणसाला आयुष्यात कधी, कधी तडजोडी कराव्या लागतात. कुटुंब, आर्थिक आघाडीवरच नाही, तर प्रेमाखातर धर्म सुद्धा बदलावा लागतो. शिफा नावाच्या एका मुलीने सनातन धर्माचा स्वीकार करुन प्रियकरासोबत सात फेरे घेतले. या मुस्लिम मुलीने प्रेमासाठी हिंदू धर्म स्वीकारला. शिफाची ती संध्या झाली. या युवतीने आर्य समाज मंदिरात अनमोल नावाच्या व्यक्तीसोबत हिंदू पद्धतीने लग्न केलं. संध्या अमरोहाची राहणारी आहे. अनमोल नावाच्या युवकासोबत ती मुरादाबाद येथे राहतेय. संध्या आणि अनमोल दोघांच्या घरात कोणी या लग्नावर खुश नव्हतं. दोन्ही कुटुंबांकडून लग्नाला परवानगी नव्हती. अखेर दोघांनी लग्नासाठी ट्रस्टची मदत घेतली. रविवारी मंदिरात दोघांच लग्न लावण्यात आलं.
एक प्रायव्हेट नोकरी करताना शिफा आणि अनमोल दोघांची ओळख झाली. दोघांची मैत्री पुढे जाऊन प्रेमात बदलली. धर्म दोघांच्या लग्नाच्या आड येत होता. अनमोलने अखेर गौ सेवा ट्रस्टचे संचालक सचिन सक्सेना यांची मदत मागितली. ट्रस्टने रविवार आर्य समाज मंदिरात हिंदू पद्धतीने संध्या आणि अनमोलच लग्न लावून दिलं. आपल्या मर्जीने हिंदू धर्म स्वीकारतेय असं संध्याने सांगितलं. सुरुवातीपासून ती शाकाहारी आहे. धर्म बदलण्यात आपल्याला कुठलीही अडचण नाही, हे तिने सांगितलं.
सचिन सक्सेना काय म्हणाले?
“अमरोहा येथे राहणारी शिफा नावाची ही मुलगी दोन वर्षांपासून नोकरी करत होती. सहा महिन्यापूर्वी मुरादाबाद येथे राहणाऱ्या युवकासोबत तिची भेट झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले” असं गौ माता सेवा ट्रस्टचे संचालक सचिन सक्सेना यांनी सांगितलं. “दोघांना लग्न करायच होतं. पण कुटुंबीय राजी नव्हते. अखेर ते आमच्याकडे आले. आम्ही दोघांच लग्न लावून दिलं. मुलगी मुस्लिम धर्म बदलून सनातन धर्मात आली. आपल नाव तिने शिफाच संध्या केलं” असं सचिन सक्सेना यांनी सांगितलं.