Fact Check | खरंच उत्तर प्रदेशचे विभाजन होणार ? केंद्र सरकारची भूमिका काय ?

| Updated on: Jun 12, 2021 | 11:49 PM

केंद्र सरकार उत्तर प्रदेशचे दोन ते तीन भागांमध्ये तुकडे करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. तसे दावे सोशल मीडियावर केले जात आहे. या पार्श्वभूमीवर हा नेमका प्रकार काय आहे ? या चर्चेमध्ये तथ्य आहे का ? हे जाणून घेऊया.

Fact Check | खरंच उत्तर प्रदेशचे विभाजन होणार ? केंद्र सरकारची भूमिका काय ?
uttar pradesh
Follow us on

लखनऊ : केंद्र सरकार उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) दोन ते तीन भागांमध्ये तुकडे करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. तसे दावे सोशल मीडियावर केले जात आहे. उत्तर प्रदेशचे विभाजन केल्यानंतर पूर्वांचल हे नवे राज्य स्थापन केले जाईल, असेही म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर हा नेमका प्रकार काय आहे ? या चर्चेमध्ये तथ्य आहे का ? हे जाणून घेऊया. (Uttar Pradesh to be divided into Three parts by central government know truth fact check)

लोकसंख्येचा विचार करुन देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचे 2000 साली विभाजन करण्यात आले. विभाजन केल्यानंतर उत्तर प्रदेशमधून उत्तरांचल नावाचे नवे राज्य तयार करण्यात आले. आता या राज्याला आपण उत्तराखंड म्हणतो. त्यानंतर आता उत्तर प्रदेशचे आणखी विभाजन होणार आहे असे म्हटले जातेय.

विभाजनाची चर्चा नेमकी कशामुळे ?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतंच दिल्लीचा दौरा केला. या काळात त्यांनी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीकडे अनेक अंगांनी पाहिले जात आहे. याच भेटीनंतर उत्तर प्रदेशचे विभाजन केले जाणार आहे, अशी चर्चा केली जात आहे.

सोशल मीडियावर काय चर्चा ?

उत्तर प्रदेशचे एकूण दोन ते तीन भागांत विभाजन होणार आहे, असा दावा सोशल मीडियावर केला जातोय. लवकरच उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका लागणार आहेत. त्यापूर्वी उत्तर प्रदेशचे विभाजन करुन त्याद्वारे पूर्वांचलला वेगळे राज्य बनवले जाऊ शकते. मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या झालेल्या बैठकीत त्यावर सहमती झाली आहे. त्यानंतर आता योगी आदित्यनाथ यांची बैठक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत होणार आहे, असाही दावा केला जातोय.

खरंच उत्तर प्रदेशचे विभाजन होणार ?

सोशल मीडियावर उत्तर प्रदेशचे विभाजन होणार आहे; अशी चर्चा सुरु झाल्यानंतर पीआयबीने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. पीआयबीने आपल्या फॅक्ट चेकर टीमच्या माध्यमातून ट्विट करत यावर भाष्य केले आहे.

पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, “एका बातमीमध्ये उत्तर प्रदेशचे दोन ते तीन भागांमध्ये विभाजन केले जाणार असून त्यातून पूर्वांचल तसेच इतर राज्ये बनवले जातील असा दावा केला जातोय. मात्र, हा दावा पूर्णपणे खोटा असून उत्तर प्रदेशचे विभाजन करण्याचा कोणताही विचार केंद्र सरकारचा नाही,” असे पीआयबीने सांगितले आहे.

दरम्यान, पीआयबीच्या या माहितीनंतर उत्तर प्रदेशच्या विभाजनाच्या चर्चेला विराम मिळाला आहे. सध्यातरी केंद्र सरकारचा उत्तर प्रदेशच्या विभाजनाचा असा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

इतर बातम्या :

ब्लॅक फंगसची औषधे जीएसटी मुक्त, रेमडेसिवीरवर 7 टक्के सूट तर व्हॅक्सिनवर 5 टक्के कर कायम; केंद्र सरकारची मोठी घोषणा

Punjab Election 2022: अकाली दल आणि बसपाची आघाडी, 25 वर्षानंतर एकत्र; पंजाबमध्ये काँग्रेसच्या सत्तेला मोठं आव्हान!

Coronavirus: देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, 70 दिवसांच्या निचांकी पातळीवर

(Uttar Pradesh to be divided into Three parts by central government know truth fact check)