उत्तराखंड: उत्तराखंडच्या जोशीमठ तालुक्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. जोशीमठात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जोशीमठ तालुक्यात अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. (uttarakhand ice storm in joshimath dam broken many drowned)
आज सकाळी 10.55 वाजता ही दुर्घटना घडली. जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात हिमकडा कोसळला. त्यामुळे या धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यातच या धरणाचा कडाही तुटल्याने या ठिकाणी पाणीच पाणी झाले असून अनेक घरे आणि माणसे वाहून गेले आहेत. निसर्गाच्या या प्रकोपामुळे उत्तराखंडमध्ये एकच हाहाकार माजला असून या ठिकाणी अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
गावंच्या गावे वाहून गेली?
मोठा हिमकडा कोसळून नदीला महापूर आल्याने पुराचे पाणी घराघरात शिरले आहे. त्यामुळे धरणाजवळची अनेक गावं या पुरात वाहून गेली आहेत. तसेच माणसे, गुरेढोरेही वाहून गेली असून शेतीचंही मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. या ठिकाणी प्रशासानाचे कर्मचारी आणि रेस्क्यु ऑपरेशन टीम पोहोचली असून युद्धपातळीवर रेस्क्यु ऑपरेशन सुरू आहे.
हिमकडा कोसळल्यानंतर झालेला हाहाकार दाखवणारा व्हिडीओ
अफवांवर विश्वास ठेवू नका
या महाभयंकर घटनेवर मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. टचमोली जिल्ह्यात ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि आपत्कालीन विभागांना आपत्ती निवारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. खबरादारीचे सर्व उपाय योजले जात आहेत, असं रावत यांनी सांगितलं.
ऋषीगंगा प्रकल्पाला मोठी हानी
तपोवन रैणी परिसरात हिमकडा तुटल्याने ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टला मोठी हानी पोहोचली आहे. नदीचा जलस्तर वाढला आहे. त्यामुळे अलकनंदा नदीच्या किनारी असलेल्यांनी लवकरात लवकर दुसरीकडे शिफ्ट व्हावं, असं आवाहन चमोली पोलिसांनी केलं आहे.
ITBP च्या दोन टीम घटनास्थळी, NDRF ला डेहराडूनला रवाना
गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, ITBP ची दोन पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत. NDRF च्या तीन तुकड्यांना डेहराडूनला रवाना करण्यात आलं आहे. आणि आयएएएफ हेलिकॉप्टरच्या मदतीने अतिरिक्त तीन संघ संध्याकाळपर्यंत पोहोचणार आहेत.
ऋषिकेश धरण रिकामं करणार
खबरदारीचा उपाय म्हणून भागीरथी नदीचा वाढता प्रवाह रोखण्यासाठी श्रीनगर धरण आणि ऋषिकेश धरण रिकामं करण्यात येईल, असं मुख्यमंत्री रावत यांनी सांगितलं.
ऋषी गंगा प्रकल्पाचं मोठं नुकसान
ऋषी गंगा प्रकल्पाला मोठं नुकसान झालं असून चमोलीच्या सखल भागांना अर्लट जाहीर करण्यात आला आहे. या महापुरात 50 ते 75 जण बेपत्ता झाले असून या घटनेनंतर 4 जिल्ह्यात अॅलर्ट जारी करण्यात आल्याचं डीजीपीने सांगितलं.
सरकारकडून हेल्पलाईन जारी
या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने तात्काळ हेल्पलाइन क्रमांक जारी- 1070 आणि 9557444486 जारी केला आहे. तसेच या दुर्घघटनेमध्ये अडकलेल्या लोकांसाठी हेल्पलाईन. 9557444486 हा हेल्पालाईन नंबर जारी करण्यात आला आहे.
पोलिसांकडून हेल्पलाईन जारी
व्हॉट्सअॅप नंबर 9458322120,
FaceBook chamoli police,
Twitter @chamolipolice @SP_chamoli,
Instagram chamoli_police
#WATCH | Water level in Dhauliganga river rises suddenly following avalanche near a power project at Raini village in Tapovan area of Chamoli district. #Uttarakhand pic.twitter.com/syiokujhns
— ANI (@ANI) February 7, 2021
संबंधित बातम्या:
शेतकरी आंदोलन : इंटरनेट बंदीचा मुद्दा गेला सर्वोच्च न्यायालयात
Farmer Protest : महात्मा गांधी जयंतीपर्यंत शेतकरी आंदोलन सुरु राहणार, राकेश टिकैत यांची मोठी घोषणा