उत्तराखंड: उत्तराखंडच्या जोशीमठात हिमकडा कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेचा पहिला व्हिडीओ आला असून त्यातून निसर्गाने उडवलेला हाहाकार दिसून येतोय. नदीच्या रौद्ररुपावरून अनेक लोक वाहून जाताना दिसत असून व्हिडीओतून स्थानिकांचा आक्रोशही ऐकायला मिळत आहे. हा व्हिडीओ अत्यंत धक्कादायक असून हा व्हिडीओ पाहिल्यास तुमचाही थरकाप उडेल असाच आहे. (Uttarakhand ice storm in joshimath dam broken, watch video)
उत्तराखंडामध्ये हिमकडा कोसळल्यानंतर चमौली येथील धौली गंगा नदीला मोठा महापूर आला आहे. त्याचा 3 मिनिटे सहा सेकंदाचा व्हिडीओ आला आहे. या व्हिडीओत धौली गंगा दोन डोंगररांगामधून वाहताना दिसत आहे. मात्र, या नदीला महापूर आला असून ही नदी आक्राळविक्राळ रुप धारण केलेली दिसत आहे.
नदीने अत्यंत रौद्ररुप धारण केलं असून पाणी आपलं नेहमीचं वळण सोडून गावात जाताना दिसत आहे. जोरदार वर्षाव व्हावा तसं हे पाणी अत्यंत वेगाने गावात शिरताना दिसत आहे. पापणी लवण्याच्या आत पाण्याचा प्रवाह गावात शिरताना दिसत असून त्यामुळे नदीकाठच्या गावांना पाण्याने घेरलेलं दिसत आहे. त्यामुळे काही ठिकाणी लोकांची पळापळ सुरू असलेलं दिसत आहे.
गावं सोडा, तरुणाचा टाहो
धौली नदीने रौद्ररुप धारण केल्यानंतरचा हा सकाळी घेतलेला व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ 11 च्या सुमारास घेतला आहे. हा व्हिडीओ काढणारा तरुण महापूर आला असून तुम्ही गावं सोडून निघून जा असं वारंवार घसा फोडून सांगत आहे. तसेच हा महापूर किती भयंकर आहे आणि त्यामुळे काय नुकसान होऊ शकतं हे तो वारंवार सांगत आहे. हा व्हिडीओ काढणारा तरुण प्रचंड घाबरलेला दिसत आहे. त्याचा मोबाईल सारखा हलत असल्याने व्हिडीओही हालताना दिसत आहे. या व्हिडीतील तरुण कण्हत आहे. विव्हळत आहे. प्रचंड घाबरल्याने तो स्थानिक भाषेत लोकांना सावध करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. (Uttarakhand ice storm in joshimath dam broken, watch video)
#WATCH | Water level in Dhauliganga river rises suddenly following avalanche near a power project at Raini village in Tapovan area of Chamoli district. #Uttarakhand pic.twitter.com/syiokujhns
— ANI (@ANI) February 7, 2021
चार जिल्ह्यांना अॅलर्ट जारी
उत्तराखंडच्या जोशीमठ तालुक्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. जोशीमठात मोठा हिमकडा कोसळल्याने धावली नदीला महापूर आला असून पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर सुमारे 75 लोक वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जोशीमठ तालुक्यासह चार जिल्ह्यांना अॅलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना गावं सोडून इतरत्र जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. (Uttarakhand ice storm in joshimath dam broken, watch video)
संबंधित बातम्या:
(Uttarakhand ice storm in joshimath dam broken, watch video)