Uttarkashi Tunnel Rescue | उत्तराखंडच्या उत्तरकाशी सिलक्यारा टनेलमध्ये मागच्या 12 दिवसांपासून 41 मजूर अडकले आहेत. या सगळ्या मजूरांना आज नवीन आयुष्य मिळू शकतं. NDRF ची टीम भुयाराच्या आता पोहोचली आहे. 12 नोव्हेंबरला भुयाराच काम सुरु असताना एक भाग कोसळला, तेव्हापासून हे सगळे मजूर तिथे अडकून पडले आहेत. अथक प्रयत्नानंतर बचावपथक या मजूरांपर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे आजचा दिवस या मजुरांसाठी दिवाळीपेक्षा कमी नसेल. महत्त्वाच म्हणजे हे सर्व मजूर सुरक्षित आहेत. या मजुरांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी पूजा-अर्चा, प्रार्थना सुरु आहेत. मंगळवारी या मजुरांचा भुयारातील पहिला फोटो समोर आला होता. त्यावरुन हे सर्व मजूर सुरक्षित असल्याच स्पष्ट झालं. घटनास्थळी सर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वकाही ठरल्याप्रमाणे सुरळीत पार पडलं, पुढच्या दोन-तीन तासात हे मजूर टनेलच्या बाहेर येतील.
रेस्क्यू ऑपरेशन टीमचे सदस्य गिरीश सिंह रावत यांनी सांगितलं की, रेस्क्यू ऑपरेशन शेवटच्या टप्प्यात आहे. 1-2 तासात रिझल्ट मिळेल, अशी अपेक्षा आहे. मजूरांना बाहेर काढण्यासाठी पाइपलाइन टाकण्यात आली आहे. ढिगाऱ्यामधील स्टीलच तुकडे कापून बाजूला करण्यात आले आहेत. टनेलमध्ये ड्रिलिंगच काम जोरात सुरु आहे. सकाळी 8 वाजेपर्यंत ऑपरेशन पूर्ण होऊ शकतं. घटनास्थळी रुग्णवाहिकेसह सर्व गाड्या आहेत. नॅशनल व्हॅक्सीन व्हॅन सुद्धा तिथे आहे. मागच्या दोन दिवसांपासून सरळ ऐवजी आडव्या ड्रिलिंगची स्ट्रॅटजी आखण्यात आली होती. ढिगाऱ्याचा महत्त्वाचा भाग कापून बाजूला हटवण्यात यश आलय. त्यामुळे मजुरांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर झाला.
#WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue | Latest visuals from the site where the rescue operation is underway to rescue the trapped workers pic.twitter.com/0mRSVXTplC
— ANI (@ANI) November 23, 2023
सुटकेची स्ट्रॅटजी काय आहे?
900 एमएमचे पाईप 60 मीटर आतपर्यंत सोडायचे. त्याआधारे मजूर बाहेर येऊ शकतात. आता पाईप मजूरांपर्यंत पोहोचण्यात फक्त काही मीटरच अंतर बाकी आहे. विविध यंत्रणा या रेस्क्यु मिशनमध्ये आहेत. NDRF च्या टीमने संध्याकाळी भुयारात प्रवेश केला. 12 रुग्णावाहिका, 15 डॉक्टर्सची टीम आणि 40 बेडच हॉस्पिटल सुसज्ज आहे. अमेरिकन बनावटीची ऑगर मशीन शुक्रवारी दुपारी टणक पुष्ठभागाला धडकली. त्यानंतर ड्रिलिंग बंद करण्यात आलं होतं. ड्रिलिंग थांबवताना 22 मीटरपर्यंत ढिगारा हटवून त्यात 6 मीटर लांबीचे 900 मिलीमीटर व्यासाचे चार पाइप टाकण्यात आले होते.