नवी दिल्लीः देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागार पदी व्ही. अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डिसेंबर 2021 मध्ये के. व्ही. सुब्रमण्यम यांचा कार्यकाल संपल्यानंतर या पदावर कुणीचीही नियुक्ती (appointed) करण्यात आली नव्हती. सुब्रमण्यम यांच्या राजीनाम्यानंतर या पदावर कुणाचीच नेमणूक केली नव्हती. त्यानंतर व्ही. अनंत नागेश्वरन यांच्यावर ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. भारताची अर्थव्यवस्था (Economy of India) जगात तिसऱ्या क्रमाकांची आहे. कोरोनासारखी (Corona) महामारी येऊनही भारताच्या अर्थव्यवस्थेला कोणताही धक्का पोहचला नाही. मात्र बेरोजगारीसारखा गंभीर प्रश्न भारतासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे भारत सरकारसमोर एक भक्कम अर्थव्यवस्था उभी करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर मोठे प्रश्न असले तरी या परिस्थितीत नवीन मुख्य आर्थिक सल्लागारांकडून गुंतवणूकीचे पुनरुज्जीवन करणे आणि अर्थसंकल्पातील तफावत भरून काढताना उच्च वाढीसाठी नवी योजना काय आखणार याकडेच साऱ्यांचे लक्ष असणार आहे.
डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन हे आंध्र प्रदेशातील विद्यापीठात अतिथी प्राध्यापक म्हणून काम करतात. त्यांना आर्थिक परिस्थिती हातळण्याचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. डॉ. नागेश्वरन यांनी 1985 मध्ये अहमदाबादमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी एमबीए केले आहे. देवाण-घेवाणीच्या आर्थिक व्यवहारावर त्यांचे मोठे काम आहे. मॅसॅच्युसेटस एमहर्स्ट विद्यापीठाने त्यांना डॉक्टर पदवी प्रदान केली आहे.
डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांनी सिंगापूरमधील बॅंक ज्युलियस बेयर अॅंड कंपनीचे गुंतवणूक अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन हे आयएफएमआर स्कुल ऑफ बिझनेसचे 2018 ते 2019 या काळात ते मुख्य अधिष्ठाता राहिले आहेत. त्यानंतर 2021 पासून त्यांनी भारताच्या पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे.
कोरोना काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. सध्याच्या काळात भारतासमोर खरी समस्या निर्माण झाली आहे, बेरोजगारीची. खासगी क्षेत्रात आर्थिक मंदीचा फटका बसल्याने बेरोजगारीच्या प्रश्नाने डोके वर काढले आहे. कोरोना काळात बिघडलेली आर्थिक घडी योग्य मार्गावर आणण्याचे काम डॉ. नागेश्वरन यांच्याकडे असणार आहे. वेगवेगळ्या संस्थांमधून त्यांनी अर्थव्यवस्थेची कामं बघितली असली तरी सध्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा प्रश्न असल्याने त्यांचा प्रत्येक निर्णय हा देशासाठी कसा ठरणार हे येणारा काळच ठरवणार आहे. त्यामुळे महामारीच्या काळातील अर्थव्यवस्थेला ते कशी झळाली मिळवून देतात ते आता त्यांचे निर्णयच उत्तर देणार आहेत.
संबंधित बातम्या